आता एकाचवेळी खेळणार 2 टीम इंडिया, BCCI चा मोठा निर्णय

आता एकाचवेळी खेळणार 2 टीम इंडिया, BCCI चा मोठा निर्णय

एकाचवेळी दोन टीम इंडिया खेळण्याचा योग 1998 नंतर पहिल्यांदा आला आहे. मात्र ही परंपरा आता पुढेही सुरु राहणार आहे. बीसीसीआयने (BCCI) तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

  • Share this:

मुंबई, 17 जून : टीम इंडियातील मुख्य खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये आहेत. त्यामुळे शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली नवी टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध वन-डे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या या मालिकेसाठी 20 खेळाडूंची निवड देखील झाली आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन टीम इंडिया खेळणार आहेत. एकाचवेळी दोन टीम इंडिया खेळण्याचा योग 1998 नंतर पहिल्यांदा आला आहे. ही परंपरा आता पुढेही सुरु राहणार आहे. बीसीसीआयचे (BCCI) कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

का खेळणार 2 टीम इंडिया?

कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) बदललेल्या परिस्थिमिमुळे क्रिकेटपटूंसमोरचे आव्हान वाढले आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन टीम इंडिया खेळण्याची पद्धत पुढेही सुरु राहू शकते. यामुळे अधिक द्विपक्षीय मालिका होतील, तसेच खेळाडूंचे वर्क लोड मॅनेजमेंट देखील होणार आहे.

धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, " युवा टीम इंडियाला आणखी एक मर्यादीत ओव्हर्सची मालिका खेळावी लागू शकते. प्रमुख खेळाडू दुसरिकडे खेळत असताना किंवा त्यांना विश्रांतीची गरज असेल, तेव्हा ही मालिका होईल. एकाच वेळी दोन टीम इंडिया हे आपली बेंच स्ट्रेंथ मजबूत असल्याचे लक्षण आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या निर्बंधाचाही विचार केला पाहिजे. कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी अधिक द्विपक्षीय मालिका होऊ शकतात.

शेवटच्या सत्रामध्ये टीम इंडियाचं कमबॅक, पदार्पणातच स्पिनर्सचा जलवा

टीम इंडिया 13 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध तीन वन-डे आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी 6 खेळाडूंचा पहिल्यांदाच टीममध्ये समावेश झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया इंग्लंडमध्ये टेस्ट मालिकेची  तयारी करत असतानाच शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली यंग ब्रिगेड श्रीलंकेत मालिका खेळणार आहे.

Published by: News18 Desk
First published: June 17, 2021, 8:40 AM IST

ताज्या बातम्या