• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन Tim Paine नं दिला राजीनामा, अश्लील मेसेज पाठवल्यानं सोडली कॅप्टनसी

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन Tim Paine नं दिला राजीनामा, अश्लील मेसेज पाठवल्यानं सोडली कॅप्टनसी

ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेननं (Tim Paine) कॅप्टनसीचा राजीनामा दिला आहे. टीम पेननं पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्याची घोषणा केली.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेननं (Tim Paine) कॅप्टनसीचा राजीनामा दिला आहे. इंग्लंड विरुद्ध पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस सीरिजपूर्वी त्यानं ही घोषणा केली आहे. महिला सहकाऱ्याला अश्लील मेसेज आणि आक्षेपार्ह फोटो पाठवल्याच्या प्रकरणात त्यानं हा राजीनामा दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. टीम पेननं पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्याची घोषणा केली. 'मी आज ऑस्ट्रेलियन टीमची कॅप्टनसी सोडत आहे. हा एक अवघड निर्णय असला तरी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि क्रिकेटसाठी योग्य आहे.' असे पेननं जाहीर केलं. चार वर्षांपूर्वी महिला कर्मचाऱ्याला पाठवलेल्या अश्लील मेसेज प्रकरणात पेननं हा राजीनामा दिला आहे. त्याचा हा राजीनामा स्विकारण्यात आल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलं आहे. टीम पेनच्या जागी टेस्ट टीमच्या कॅप्टनपदासाठी पॅट कमिन्सचं (Pat Cummins) नाव सर्वात आघाडीवर आहे. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन ही नावं देखील चर्चेत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजला 8 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. रोहित आणि अश्विनला नंबर 1 होण्याची संधी, पाहा घरच्या मैदानावर कसा आहे धोनीचा रेकॉर्ड काय म्हणाला पेन? 'माझ्या राजीनाम्याचे कारण चार वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. त्यावेळी मी एका सहकाऱ्याला मेसेज केले होते. त्या प्रकरणाची क्रिकेट ऑस्ट्रेलियानं चौकशी केली. मी या चौकशीला पूर्ण सहकार्य केलं.  त्या प्रकरणात कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं नसल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालं. माझी या प्रकरणातून मुक्तता झाली. मला त्या घटनेबद्दल तीव्र खेद होता, आजही आहे. मी त्यावेळी माझी पत्नी आणि कुटुंबाशी चर्चा केली त्यांनी मला माफ केले. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. ही घटना संपली आणि मी आता क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं होतं. मागील तीन-चार वर्षांमध्ये मी तेच केले. ते सर्व मेसेज सार्वजनिक होत असल्याचं मला नुकतंच समजलं. माझी 4 वर्षांपूर्वीची कृती ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन म्हणून असलेल्या अपेक्षांना योग्य नाही. त्यामुळे माझी पत्नी, माझे कुटुंब आणि दुसऱ्या पक्षाला झालेल्या त्रासाबद्दल मला खेद आहे. मी यामुळे आमच्या खेळाच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहचवल्याबद्दलही खेद व्यक्त करतो. मी तातडीने कॅप्टनसी सोडत आहे. अ‍ॅशेससारख्या मोठ्या सीरिजपूर्वी माझी कृती टीमसाठी त्रासदायक ठरू नये, अशी माझी इच्छा आहे.' असं पेननं स्पष्ट केलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: