पावसामुळे सामना रद्द झाला; क्रिकेटपटू झाले दारू पिऊन टल्ली!

पावसामुळे सामना रद्द झाला; क्रिकेटपटू झाले दारू पिऊन टल्ली!

सामना रद्द झाला म्हणून क्रिकेटपूट लवकर हॉटेलवर गेले आणि...

  • Share this:

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून काहीना काही वादामुळे श्रीलंकेचा क्रिकेट संघ चर्चेत आहे. श्रीलंकेचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. अनेक क्रिकेटपटूंनी पाक दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. लसित मलिंगा, थिसारा परेरा यासह संघातील काही खेळाडूंनी पाक दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेच्या या दौऱ्यावरून खुद्ध संघ व्यवस्थापक आणि देशातील माजी क्रिकेटपटूंमध्ये मतभेद असल्यामुळे वाद सुरू आहे. त्यात आता श्रीलंकेचा 19 वर्षाखालील संघ वादात सापडला आहे.

नुकत्याच झालेल्या 19 वर्षाखालली आशिया कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये झालेल्या सामन्यात संघातील 3 खेळाडूंना दारूच्या नशेत पकडण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण संघावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्पर्धेतील नॉक आऊट फेरीत श्रीलंकेचा भारताविरुद्ध (India vs Sri lanka)चा सामना पावसामुळे रद्द झाला. सामना रद्द झाल्यामुळे सर्व खेळाडू लवकर हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलवर आल्यानंतर संघातील काही खेळाडूंनी मद्य घेतले होते. अधिक प्रमाणात मद्य घेतल्यामुळे या खेळाडूंनी रुमच्या बाल्कनीत उलटी केली होती. परिस्थितीत तेव्हा हाताबाहेर गेली जेव्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांना बोलवावे लागले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघातील ज्या खेळाडूंची मद्य घेतल्यामुळे प्रकृती बिघडली होती त्यापैकी दोघे जण हे फलंदाज आहे तर एक फिरकीपटू आहे. श्रीलंक क्रिकेटने या सर्व क्रिकेटपटूंची नावे जाहीर केले आहेत पण ती नावे सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत. स्कूल बॉयज असोसिएशनच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार संबंधित खेळाडूंवर कठोर कारवाई केली जावी. तसेच आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी त्यांचा विचार करण्यात येऊ नये. 19 वर्षाखालील आशिया कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सेमीफायनलमध्ये श्रीलंके आणि भारत यांचा सामना रद्द करण्यात आला. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. स्पर्धेतील साखळी सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. या आधारावर भारताला अंतिम फेरीत स्थान मिळाले तर श्रीलंका स्पर्धे बाहेर पडली. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव करून विजेतेपद मिळवले.

VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 11:27 AM IST

ताज्या बातम्या