Home /News /sport /

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मुंबईचा हा फास्ट बॉलर रेसमध्ये

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मुंबईचा हा फास्ट बॉलर रेसमध्ये

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) यांना दुखापत झाल्यामुळे फास्ट बॉलर म्हणून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.

    मुंबई, 20 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टेस्ट सीरिजसाठी पाचवा बॉलर म्हणून हैदराबादचा मोहम्मद सिराज किंवा मुंबईचा शार्दुल ठाकूर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. तसंच गुजरातचा डावखुरा ऑलराऊंडर अक्सर पटेलही या शर्यतीत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत टी-20, वनडे आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या आठवड्याच्या शेवटी टीम इंडियाची निवड समिती सुनिल जोशी यांच्या नेतृत्वात टीम इंडियाची निवड करेल. भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा यांच्या दुखापतीमुळे नवदीप सैनी हा टीम इंडियाचा चौथा फास्ट बॉलर असेल हे निश्चित मानलं जात आहे. तसंच मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव हे फास्ट बॉलर टीमचं प्राधान्य आहेत. तसंच पाचव्या स्थानासाठी मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्यात स्पर्धा आहे. सिराजने इंडिया-ए आणि रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तर शार्दुल ठाकूर नवीन बॉल स्विंग करू शकतो. ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्या ठाकूरला मदतही करू शकतात. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या टेस्टच्या पहिल्याच ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरला दुखापत झाली होती. 'सिराजने इंडिया-ए साठी चांगली बॉलिंग केली आहे. टेस्टसाठी तो चांगला बॉलर आहे, तसंच ऑस्ट्रेलियातलं वातावरणही त्याला मदत करेल. तसंच शिवम मावीकडेही नवीन निवड समितीने बघितलं पाहिजे,' असं निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले आहेत. एमएसके प्रसाद पीटीआयशी बोलत होते. शार्दुलबरोबरच त्याच्या आयपीएलच्या चेन्नई टीममधला साथीदार दीपक चहरला वनडे आणि टी-20 मध्ये जागा मिळेल, तर उमेश यादव मात्र मर्यादित ओव्हरमध्ये दिसण्याची शक्यता कमी आहे. तर विकेट कीपर म्हणून टीममध्ये 4 पर्याय आहेत. केएल राहुल, ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि ऋद्धीमान सहा यांच्यात विकेट कीपर म्हणून स्पर्धा असेल. यांच्यातून होणार टीम इंडियाची निवड विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, केएल राहुल, शिखर धवन, पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन, ऋद्धीमान सहा, रविंद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, अक्सर पटेल, मोहम्मद सिराज
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या