मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /‘या’ क्रिकेटपटूचे विक्रम सचिन, द्रविडला मोडता आले नाही!

‘या’ क्रिकेटपटूचे विक्रम सचिन, द्रविडला मोडता आले नाही!

    नवी दिल्ली, 29 जानेवारी: भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू होऊन गेले ज्यांच्या करिअरचा कालावधी अगदी छोटा होता. तरी देखील कामगिरीचा विचार करता अनेक विक्रम या क्रिकेटपटूंनी स्वत:च्या नावावर केले. अशाच एका क्रिकेटपटूपैकी एक म्हणजे विनोद कांबली होय. विनोदने 29 जानेवारी 1993 रोजी कोलकाता येथे ईडन गार्डन मैदानावर कसोटीत पदार्पण केले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबली यांची जोडी लहानपणापासून क्रिकेटचे मैदान गाजवत होती. या दोघांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण जवळ जवळ एकाच वेळी झाले. अर्थात विनोदचे करिअर फारच छोटे ठरले. पण असे काही विक्रम विनोदने स्वत: च्या नावावर केले आहेत जे खुद्द सचिनला देखील मोडता आले नाहीत. 21व्या वर्षी कसोटीत पदार्पण करणाऱ्या विनोद कांबलीने 23व्या वर्षी अखेरची कसोटी खेळली होती. नजर टाकूयात विनोदच्या विक्रमांवर...

    सर्वात कमी वयात द्विशतक

    भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात द्विशतक करण्याचा विक्रम विनोदच्या नावावर आहे. त्याने 21 वर्ष 32 दिवस वय असताना इंग्लंडविरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात 224 धावांची खेळी केली होती. याबाबत सचिन तेंडुलकरचा विचार केल्यास त्याने 1999मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 26व्या वर्षी पहिले द्विशतक झळकावले होते.

    षटकाराने सुरुवात...

    विनोदने 1989मध्ये रणजी क्रिकेटमध्ये पहिला सामना खेळला. गुजरातविरुद्ध झालेल्या या पहिल्या सामन्याच्या विनोदने षटकार मारून रणजी क्रिकेटची सुरुवात केली होती

    दोन कसोटी सामन्यात दोन द्विशतके

    1993मध्ये विनोदने सलग दोन कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले होते. भारतीय कसोटी क्रिकेटमधील हा एक विक्रम आहे. विनोदने इंग्लंडविरुद्ध 224 धावा केल्या होत्या. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध 227 धावांची खेळी करत सलग दोन द्विशतक करण्याचा विक्रम केला होता.

    कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १ हजार धावा

    विनोद कांबलीने कसोटी क्रिकेटमधील 14 डावात १ हजार धावा केल्या होत्या. भारताच्या वतीने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 1 हजार धावा करण्याचा विक्रम विनोदच्या नावार आहे. इतक नाही तर सरासरीच्या बाबतीत सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांच्यापेक्षा विनोदची सरासरी अधिक आहे. त्याने 17 कसोटीत 2 द्विशतके, 4 शतकांच्या मदतीने 54.2 सरासरीने 1 हजार 084 धावा केल्या आहेत.

    SPECIAL REPORT : तुमचे लहानगे मृत्युशी खेळत आहे का?

    First published:

    Tags: Cricket, Sachin tendulkar, Vinod kambli