मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /पाकिस्तानची पुन्हा फजिती, फास्ट बॉलरला इंग्लंडहून जबरदस्तीनं घरी पाठवलं

पाकिस्तानची पुन्हा फजिती, फास्ट बॉलरला इंग्लंडहून जबरदस्तीनं घरी पाठवलं

पाकिस्तानचे क्रिकेटपटू (Pakistan Cricket Team) आणि वाद यांच्यात जुने नाते आहे. पाकिस्तानचे खेळाडू कायम वेगवेगळ्या वादामुळे चर्चेत असतात. आता पाकिस्तानच्या एका दिग्गज फास्ट बॉलरला इंग्लंडमधून जबरदस्तीनं घरी पाठवण्यात आले आहे.

लंडन, 10 जुलै : पाकिस्तानचे क्रिकेटपटू (Pakistan Cricket Team) आणि वाद यांच्यात जुने नाते आहे. पाकिस्तानचे खेळाडू कायम वेगवेगळ्या वादामुळे चर्चेत असतात. आता पाकिस्तानच्या एका दिग्गज फास्ट बॉलरला इंग्लंडमधून जबरदस्तीनं घरी पाठवण्यात आले आहे.  त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा जगासमोर फजिती झाली आहे.

पाकिस्तानचा अनुभवी फास्ट बॉलर वहाब रियाझवर (Wahab Riaz) ही वेळ आली आहे. रियाझ इंग्लंडमध्ये लवकरच सुरु होणाऱ्या 'द हंड्रेड' या स्पर्धेसाठी गेला होता. तो ट्रेंट रॉकेट्स या टीमचा सदस्य होता. पण रियाझकडे वर्क व्हिसा नसल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आणि त्याला तातडीने परत पाठवले. रियाझवरील या कारवाईने त्याच्या टीमला देखील धक्का बसला आहे.

वहाबला आता पुन्हा एकदा वर्क व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. हा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्याला इंग्लंडमध्ये जाता येईल. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर नॅथन कुल्टर नाईलनं (Nathan Coulter-Nile) स्पर्धेतून माघार घेतल्यानं रियाझची निवड करण्यात आली होती. रियाझची इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या पाकिस्तानच्या टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही. त्यानंतर त्याने 'द हंड्रेड' स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेली ही स्पर्धा यंदा 21  जुलैपासून सुरू होणार आहे.

WI vs AUS : आंद्रे रसेलची 10 वर्षांची प्रतीक्षा संपली, पहिल्यांदाच केली 'ही' कामगिरी

वहाब रियाझ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) त्याने 18 विकेट्स घेतल्या होत्या. या चांगल्या कामगिरीनंतरही पाकिस्तान टीममध्ये निवड न झाल्यानं त्याने मीडियासमोर नाराजी व्यक्त केली होती.

First published:

Tags: Cricket news, England, Pakistan