मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 वर्ल्ड कपमधील पराभावाचे पडसाद, टीम इंडियाच्या खेळाडूकडून निवृत्तीचे संकेत

T20 वर्ल्ड कपमधील पराभावाचे पडसाद, टीम इंडियाच्या खेळाडूकडून निवृत्तीचे संकेत

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचं आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आलं. या निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूंच्या जागेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचं आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आलं. या निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूंच्या जागेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचं आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आलं. या निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूंच्या जागेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 नोव्हेंबर :  आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याचं टीम इंडियाचं स्वप्न यावर्षीही अपूर्ण राहिलं. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमचं आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आलं. या निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूंच्या जागेवर प्रश्न उपस्थित होत असून तरुण खेळाडूंना संधी देण्याची मागणी होत आहे. टीम इंडियातील अनुभवी खेळाडूनंही काळाची पावलं ओळखत निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यानं इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधून निवृत्तीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

भारतीय क्रिकेट टीममधील अनुभवी विकेटकीपर दिनेश कार्तिक याच्यासाठी नुकतीच झालेली टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा 2022 खूपच निराशाजनक राहिली. फिनिशर म्हणून जी अपेक्षा त्याच्याकडून क्रिकेट चाहत्यांना होती, त्या अपेक्षा तो पूर्ण करू शकलेला नाही. त्यानंतर त्यानं ही भावनिक पोस्ट लिहली आहे.

इंग्लंडविरुद्ध पदार्पण

कार्तिकची क्रिकेटमधील कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे. त्यानं 5 सप्टेंबर 2004 रोजी टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. लॉर्ड्स वन-डेमध्ये तो इंग्लंडविरुद्ध पहिली मॅच खेळला होता. तर, यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत तो शेवटची मॅच 2 नोव्हेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला. या मॅचमध्ये त्याला केवळ 7 रन काढता आले.

आधी घेतली विल्यमसनची शाळा, मग बॉलर्सचा समाचार; पहिल्या वन डेत पाहा 'गब्बर'ची धमाल

याशिवाय, 2019 च्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध शेवटची वन-डे मॅच कार्तिक खेळला होता. यानंतर त्याला टीम इंडियात स्थान मिळालं नाही. तेव्हाच त्याची कारकीर्द जवळपास संपली आहे, असं सर्वांनी गृहीत धरलं होतं. पण कार्तिकनं मेहनत करून आयपीएल स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली होती. कार्तिकच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीवर नजर टाकल्यास त्यानं आतापर्यंत 26 टेस्ट मॅचमध्ये 1025 रन, 94 वन-डे मॅचमध्ये 1752 रन आणि 60 टी- 20 मॅचमध्ये 686 रन केले आहेत.

इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये नेमकं काय?

दिनेश कार्तिकनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यानं संस्मरणीय फोटो शेअर केलेत. यामध्ये तो कुटुंबासह तसंच भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये कार्तिकची जुळी मुलं आणि कुटुंबही दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं आहे की, 'भारतीय टीमसाठी टी-20 वर्ल्ड कप खेळण्याचं ध्येय होतं, ज्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती. स्पर्धा खेळल्याचा अभिमान वाटतो. आम्ही आमचं लक्ष्य गमावलं, परंतु यामुळे माझं आयुष्य अनेक अद्भुत आठवणींनी भरलं आहे. माझे सर्व सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, मित्र आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे खूप खूप आभार.’

View this post on Instagram

A post shared by Dinesh Karthik (@dk00019)

दरम्यान, टी- 20 वर्ल्ड कपनंतर अनेक वरिष्ठ क्रिकेटपटू संन्यास घेत असल्याची जोरदार चर्चा आहे. अशातच दिनेश कार्तिकनं इन्स्टाग्राम पोस्ट केल्यानं त्यावरून क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

First published:

Tags: Cricket news, Instagram, Team india