मुंबई, 2 डिसेंबर : आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या टी20 मालिकेच्या तयारीला लागली आहे. दोन्ही देशांमध्ये (India vs South Africa) 9 जूनपासून 5 सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी आफ्रिकेची टीम गुरूवारी सकाळी दिल्लीमध्ये दाखल झाली. डेव्हिड मिलर आणि कागिसो रबाडा हे पूर्वीपासूनच भारतामध्ये आहेत. ते या टीममध्ये दाखल होतील. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेनं अनेक तरूण खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये ट्रिस्टियन स्टब्सचाही समावेोश आहे. स्टब्स आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.
टीम इंडियाला वर्ल्ड रेकॉर्डपासून रोखणे हे दक्षिण आफ्रिकेचे या मालिकेतील मुख्य लक्ष्य आहे. भारतीय क्रिकेट टीमनं मागील 12 टी20 मॅच जिंकल्या आहेत. आता पहिला टी20 सामना देखील टीम इंडियानं जिंकला तर सर्वाधिक सलग टी20 सामने जिंकण्याचा विक्रम भारतीय टीमच्या नावावर नोंदविला जाईल. टीम इंडियानं यापूर्वी न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या देशांविरूद्धच्या मालिकेतील सर्व सामने जिंकले आहेत. यापूर्वी अफगाणिस्तान आणि रोमानिया यांनी सलग 12 टी20 सामने जिंकले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बावूमानं सांगितलं की, 'यावर्षी टी20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. या वर्ल्ड कपची तयारी भारताविरूद्धच्या टी20 मालिकेपासून सुरू होईल. आम्ही या मालिकेत जिंकण्याचा आणि भारताला वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यापासून रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करू.'
कायरन पोलार्डचा भारतीय क्रिकेटपटूवर पलटवार, IPL मधील टीकेला दिलं उत्तर
दक्षिण आफ्रिकेचे अनेक खेळाडू सध्या फॉर्मात आहेत. ही या टीमसाठी आनंदाची बातमी आहे. डेव्हिड मिलरनं या आयपीएल सिझनमध्ये 481 रन केले आहेत. गुजरात टायटन्सच्या विजेतेपदामध्ये त्याचे महत्त्वाचे योगदान होते. टीम इंडियाच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी मिलर फॅक्टर निर्णायक ठरू शकतो. त्याचबरोबर डिकॉकनंही आयपीएल 2022 मध्ये दमदार बॅटींग केली होती. त्यानं लखनऊ सुपर जायंट्सकडून 500 पेक्षा जास्त रन केले होते.
दक्षिण आफ्रिकेची टीम : टेम्बा बावूमा (कॅप्टन), क्विंटन डुकॉक, रिझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्खिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टियन स्टब्स, रासी वान डेर डुसन, मार्को यानसेन.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, South africa, T20 cricket, Team india