Home /News /sport /

IPL च्या धामधुमीत टीम इंडियाच्या खेळाडूचं लग्न निश्चित, पत्रिका Viral

IPL च्या धामधुमीत टीम इंडियाच्या खेळाडूचं लग्न निश्चित, पत्रिका Viral

आयपीएल स्पर्धेच्या धामधुमीतच टीम इंडियाचा खेळाडूच्या लग्नाची तारीख नक्की झाली असून त्याच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

    मुंबई, 22 मे : आयपीएल स्पर्धेचा 15  वा सिझन (IPL 2022) आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. 'प्ले ऑफ' मधील 4 टीम देखील निश्चित झाल्या आहेत. पुढील आठवड्यात 'प्ले ऑफ' चे सामने होणार असून 29 मे रोजी फायनल होणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या धामधुमीतच टीम इंडियाचा फास्ट बॉलर दीपक चहरच्या (Deepak Chahar) लग्नाची तारीख नक्की झाली आहे. चहर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे. तो आयपीएल ऑक्शनमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला होता. त्याला चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) 14 कोटींमध्ये खरेदी केले. दीपकला दुखापतीमुळे या सिझनमधील एकही सामना खेळता आला नाही. त्याच्या अनुपस्थितीचा मोठा फटका चेन्नईला बसला. त्यांचं आव्हान 'प्ले ऑफ' पूर्वीच संपुष्टात आले. या दुखापतीमुळे दीपकचा आगामी टी20 वर्ल्ड कपमधील सहभाग अनिश्चित आहे. क्रिकेटपासून दूर असलेला चहरच्या वैयक्तिक आयुष्यात आनंदाची बातमी आहे. तो 1 जून रोजी त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज (Jaya Bhardwaj) बरोबर लग्न करणार आहे. दीपक आणि जया बराच काळापासून रिलेशशिपमध्ये आहेत. कॉर्पोरेट फर्मममध्ये नोकरी करणाऱ्या जयाला मागील वर्षी आयपीएल सिझनच्या दरम्यान दीपकनं प्रपोज केले होते. या दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. IPL 2022 : बुमराहची शेवटच्या मॅचमध्ये कमाल, मलिंगाच्या रेकॉर्डची केली बरोबरी चहरनं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत टीम इंडियासाठी 20 टी20 आणि 7 वन-डे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं अनुक्रमे 26 आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत. तर 63 आयपीएल मॅचमध्ये 59 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. आता लग्नानंतर लवकरात लवकर टीम इंडियात कमबॅक करण्याचा चहरचा प्रयत्न असेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Ipl 2022, Team india

    पुढील बातम्या