• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • टीम इंडियाच्या बॉलरच्या घरात कोरोनाचा शिरकाव, वडील गंभीर!

टीम इंडियाच्या बॉलरच्या घरात कोरोनाचा शिरकाव, वडील गंभीर!

आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित झाल्यानं सर्व भारतीय खेळाडू घरी परतले आहेत. त्यांना या ब्रेकमुळे कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. काही क्रिकेटपटूंसाठी मात्र सध्याचे दिवस चिंताजनक आहेत.

 • Share this:
  मुंबई, 13 मे : आयपीएल स्पर्धा (IPL 2021)  स्थगित झाल्यानं सर्व भारतीय खेळाडू घरी परतले आहेत. त्यांना या ब्रेकमुळे कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. काही क्रिकेटपटूंसाठी मात्र सध्याचे दिवस चिंताजनक आहेत. टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्या घरी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. चहलच्या आई आणि वडिलांना कोरोनाची (covid-19) लागण झाली आहे. यापैकी वडिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. चहलची पत्नी धनश्री वर्मानं (Dhanashree Verma) इन्स्टाग्रामवर (Instagram) याबाबतची माहिती दिली आहे. 'माझ्या सासू-सासऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघंही गंभीर आहेत. सासरे हॉस्पिटलमध्ये असून सासूबाईंवर घरी उपचार सुरु आहेत. मी हॉस्पिटलमध्ये होते. मी खूप खराब अवस्था पाहिली आहे. मी पूर्ण काळजी घेत आहे. तुम्ही सर्व जण घरीच राहा आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या.' यापूर्वी धनश्रीची आई आणि भावाला देखील कोरोनाची  लागण झाली होती. त्यावेळी धनश्री आयपीएलच्या बायो-बबलमध्ये होती. आता तिचे आई आणि भाऊ बरे झाले आहेत. धनश्रीनं याबाबत लिहलंय, "तो खूप अवघड आणि कसोटीचा क्षण होता. माझी आई आणि भाऊ कोरोना पॉझिटीव्ह होते आणि मी आयपीएलच्या बायो-बबलमध्ये होते. मला अतिशय हतबल वाटत होतं. मी सतत त्यांच्या तब्येतीचे अपडेट्स घेत होते. कुटुंबापासून दूर राहणं खूप अवघड असतं. चांगली गोष्ट म्हणजे ते आता बरे झाले आहेत. युजवेंद्र चहल रॉयल चॅलेंजर्स टीमचा (RCB) महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएल स्थगित होण्यापूर्वी चहलनं सात मॅचमध्ये चार विकेट्स घेतल्या होत्या. धनश्री देखील त्याच्याबरोबरच बायो-बबलमध्ये होती. कोरोनाचा उद्रेक झाल्यानं आयपीएल स्पर्धेला अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
  Published by:News18 Desk
  First published: