मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूचा दुसरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियात (Team India) निवड झालेला विकेटकिपर -बॅट्समन वृद्धीमान साहाचा (Wriddhiman Saha) दुसरा कोरोना रिपोर्ट (Covid-19 ) पॉझिटीव्ह आला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 मे: इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्ये (Team India) निवड झालेला विकेटकिपर -बॅट्समन वृद्धीमान साहाचा (Wriddhiman Saha) दुसरा कोरोना रिपोर्ट  (Covid-19) पॉझिटीव्ह आला आहे. यापूर्वी आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान (IPL 2021) त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोन आठवडे आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतरही त्याचा रिपोर्ट पुन्हा एकदा पॉझिटीव्ह आला आहे.

वृद्धीमान साहाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (WTC Final) आणि त्यानंतर होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड झाली आहे. या दौऱ्यामध्ये सहभागी होण्यापूर्वी त्याला मेडिकल रिपोर्ट सादर करण्याची सूचना निवड समितीनं केली होती. आता त्याचा दुसरा रिपोर्टही पॉझिटीव्ह आलाय. त्यामुळे तो इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. कारण, इंग्लंड दौऱ्यापूर्वी एखादा खेळाडू कोरोनाग्रस्त आढळल्यास त्याला टीममधून वगळण्यात येईल, असं बीसीसीआयनं यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

'आनंदबाजार पत्रिका' या बंगाली वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार साहामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नव्हती, तरीही त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आयसोलेशनमधून बाहेर येण्यापूर्वी त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह येणं आवश्यक आहे. पण, रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळल्यानं त्याला पुन्हा एकदा आयसोलेशनमध्ये राहवं लागेल. साहाची सोमवारी पुन्हा एकदा चाचणी केली जाईल, ती चाचणी निगेटीव्ह आल्यास त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय डॉक्टर घेऊ शकतात.

IPL 2021 च्या उर्वरित मॅच होणार नाहीत? राजस्थानच्या मालकांचं मोठं वक्तव्य

मुलीनं दिल्या होत्या शुभेच्छा

यापूर्वी साहानं आयसोलेशनमध्ये असताना त्याला मुलीनं दिलेल्या शुभेच्छा शेअर केल्या होत्या. साहानं त्याची मुलगी मियानं हातानं काढलेलं एक चित्र त्यानं शेअर केलं. त्या चित्रामध्ये सुपरमॅन कोरोना व्हायरसशी लढत आहे. 'बाबा लवकर बरे व्हा' असा मेसेज त्यावर आहे. साहानं ते चित्र शेअर करत म्हंटलं आहे की, सध्या हेच माझ्यासाठी जग आहे. मियानं तिच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभारी आहे.

साहाला या आयपीएलमध्ये फक्त 2 मॅच खेळण्याचीच संधी मिळाली. त्यामध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्यानं त्याला प्लेईंग 11 मधून वगळण्यात आलं होतं.

First published:

Tags: Coronavirus, Cricket news, Team india