मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टेस्ट टीमची जर्सी मिळाल्यानंतर टीम इंडियाची क्रिकेटपटू भावुक, इमोशनल मेसेज केला शेअर

टेस्ट टीमची जर्सी मिळाल्यानंतर टीम इंडियाची क्रिकेटपटू भावुक, इमोशनल मेसेज केला शेअर

भारतीय महिला क्रिकेट टीम (Indians Women Cricket Team) 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. महिला टीम इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक टेस्ट मॅच खेळणार आहे. टेस्ट टीमच्या जर्सीचं नुकतंच अनावरण करण्यात आले.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 31 मे : भारतीय महिला क्रिकेट टीम (Indians Women Cricket Team) 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. महिला टीम इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक टेस्ट मॅच खेळणार आहे. टेस्ट टीमच्या जर्सीचं नुकतंच अनावरण करण्यात आले. टीम इंडियाची कॅप्टन मिताली राज (Mithali Raj) आणि अनुभवी खेळाडू झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांनी सर्व खेळाडूंना ही जर्सी दिली. टीम इंडियाची मिडल ऑर्डर बॅटर जेमिमा रोड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिला देखील यावेळी जर्सी देण्यात आली. टेस्ट टीमची जर्सी मिळाल्यानंतर जेमिमा भावुक झाली. तिने सोशल मीडियावर या ऐतिहासिक प्रसंगाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणाली जेमिमा? 'आज आम्हाला रमेश सरांनी टीम मीटिंगला बोलावले आणि आम्हाला भारतीय महिला टीमचा इतिहास सांगितला. सुरुवातीपासून आत्तापर्यंत ज्या खेळांडूंमुळे ही टीम बनली आहे, त्या टीमचे आम्ही सदस्य आहोत. त्यांनी आम्हाला पुढील आव्हानांची जाणीव करुन दिली. त्यानंतर आमच्या दोन दिग्गज मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी त्यांचे अनुभव सांगितले. ही एक मोठी परंपरा आहे. या परंपरेचा आम्ही भाग झालो आहोत, याची जाणीव मीटिंग संपल्यानंतर आम्हाला झाली. आमच्यावरील जबाबदारी मोठी आहे. आम्हाला या टेस्ट जर्सीला एका नव्या उंचीवर न्यायचे आहे.' असा भावुक मेसेज जेमिमाने शेअर केला आहे. CSK साठी आनंदाची बातमी, धोनीचा सर्वात खास सहकारी UAE मध्ये खेळणार जेमिमाने यावेळी टेस्ट टीमची जर्सी मिळाल्याचा सुंदर फोटो देखील शेअर केला आहे. भारतीय टीमची इंग्लंड दौऱ्यातील एकमेव टेस्ट मॅच 16 जून पासून सुरु होणार आहे. त्यानंतर यावर्षी भारतीय टीम ऑस्ट्रेलिया विरुद्ध देखील टेस्ट मॅच खेळणार आहे.
First published:

Tags: Cricket, India vs england, Team india

पुढील बातम्या