Home /News /sport /

IND vs AUS : ...तेव्हाच सुरू होणार टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियातला सराव

IND vs AUS : ...तेव्हाच सुरू होणार टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियातला सराव

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी कमी करण्यासाठी बीसीसीआयने प्रयत्न केले होते.

    मुंबई, 8 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी कमी करण्यासाठी बीसीसीआयने प्रयत्न केले होते. याचबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. टीमच्या खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सराव करता येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 12 नोव्हेंबरला भारतीय टीम ऑस्ट्रेलियात पोहोचणार आहे. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडू 13 नोव्हेंबरपासून ट्रेनिंगला सुरुवात करणार आहे. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडू बायो बबल मैदानात एकमेकांविरुद्ध मॅच खेळू शकतात. भारतीय टीम जवळपास 60 दिवस युएईमध्ये राहिल्यानंतर ऑस्ट्रेलियात जाणार आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली शुक्रवारीच टीम इंडियाच्या दुबईमध्ये बनवण्यात आलेल्या बायो बबलमध्ये गेला आहे. आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये बँगलोरचा हैदराबादने पराभव केला होता. दुसरीकडे मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी हे टेस्ट खेळाडूही तयारीला लागले आहेत. भारतीय टीम ऍडलेडमध्ये डे-नाईट टेस्ट मॅच खेळणार आहेत. ही मॅच गुलाबी बॉलने खेळवण्यात येणार आहे. भारतीय बॅट्समनना नेटमध्ये सरावासाठी कमलेश नागरकोटी, कार्तिक त्यागी, इशान पोरेल आणि टी नटराजन हे फास्ट बॉलर ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. यातली टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारत पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय टी-20 टीम विराट कोहली, शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती भारतीय वनडे टीम विराट कोहली, शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर भारतीय टेस्ट टीम विराट कोहली, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या