कोरोनानंतर क्रिकेट पूर्वपदावर, टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची घोषणा, पाहा वेळापत्रक

कोरोनानंतर क्रिकेट पूर्वपदावर, टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची घोषणा, पाहा वेळापत्रक

कोरोना व्हायरस (Corona Virus) मुळे स्थगित झालेलं क्रिकेट पुन्हा पूर्वपदावर येत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या सीरिजची घोषणा केली आहे. 2021 साली भारतीय टीम (Team India) इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : कोरोना व्हायरस (Corona Virus) मुळे स्थगित झालेलं क्रिकेट पुन्हा पूर्वपदावर येत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या सीरिजची घोषणा केली आहे. 2021 साली भारतीय टीम (Team India) इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये दोन्ही टीममध्ये 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. 4 ऑगस्टपासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे, तर 10 सप्टेंबरला शेवटची टेस्ट मॅच खेळवली जाईल.

भारतीय टीमचा इंग्लंड दौरा

4 ते 8 ऑगस्ट- पहिली टेस्ट- ट्रेन्ट ब्रीज

12 ते 16 ऑगस्ट- दुसरी टेस्ट- लॉर्ड्स

25 ते 29 ऑगस्ट- तिसरी टेस्ट- हेडिंग्ली

2 ते 6 सप्टेंबर- चौथी टेस्ट- ओव्हल

10 ते 14 सप्टेंबर- पाचवी टेस्ट- ओल्ड ट्रॅफर्ड

पुढच्या वर्षी लागोपाठ 12 महिने खेळणार टीम इंडिया, असं असणार वेळापत्रक!

त्याआधी इंग्लंडची क्रिकेट टीम भारत दौऱ्यावरही येणार आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर इंग्लंडची टीम भारतात येईल. इंग्लंडच्या भारत दौऱ्यात 4 टेस्ट, 4 वनडे आणि 4 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. पुढच्या वर्षी भारतीय क्रिकेट टीमचं वेळापत्रक व्यस्त असणार आहे. इंग्लंडविरुद्धची सीरिज संपल्यानंतर आयपीएल सुरू होईल. आयपीएल संपल्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धची सीरिज, आशिया कप यानंतर इंग्लंडचा दौरा, मग 2021 मध्येच भारतात टी-20 वर्ल्ड कपही होणार आहे. मधल्या काळात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धची सीरिज आणि त्यानंतर वर्षाच्या शेवटी भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होईल.

Published by: Shreyas
First published: November 18, 2020, 6:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading