Home /News /sport /

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये होणार तब्बल 32 जणांची निवड, हे आहे कारण

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये होणार तब्बल 32 जणांची निवड, हे आहे कारण

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय टीममध्ये तब्बल 32 जणांची निवड होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत 3 टी-20, 3 वनडे आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

    मुंबई, 21 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय टीममध्ये तब्बल 32 जणांची निवड होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत 3 टी-20, 3 वनडे आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. पण कोरोना व्हायरस आणि खेळाडूंच्या दुखापतीच्या चिंतेमुळे बीसीसीआय मोठ्या टीमची निवड करणार आहे. भारतीय क्रिकेटपटूंना युएईप्रमाणे ऑस्ट्रेलियात कुटुंबासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे विराट कोहलीही गरोदर असलेल्या अनुष्का शर्माला सोबत ठेवू शकणार नाही. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय टीम दोन महिन्यांसाठी असणार आहे. कोरोनाच्या स्थितीमध्ये एखाद्या खेळाडूला दुखापत झाली, तर बाहेरून खेळाडू आणणं सोपं असणार नाही, कारण खेळाडूला टीममध्ये यायच्या आधी 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल. त्यामुळे खेळाडू बदलायचा असेल, तर बीसीसीआय या 32 जणांमधूनच खेळाडूंची निवड करण्याच्या तयारीत आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 'निवड समितीला आम्ही पाहिजे तेवढी मोठी टीम निवडायला सांगितली आहे, कारण भारतातून कोणत्याही खेळाडूला बोलवायची गरज पडली नाही पाहिजे,' असं बीसीसीआयने सांगितलं आहे. भारतीय क्रिकेटपटूंचं कुटुंब सध्या त्यांच्यासोबत युएईमध्ये आहे, पण आयपीएल संपल्यानंतर त्यांना भारतात परत यावं लागणार आहे. खेळाडूंना कुटुंबासोबत ठेवायचं का नाही, याचा निर्णय आयपीएल फ्रॅन्चायजीनी घ्यावा, असं बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं होतं. एमएस धोनीचं कुटुंब त्याच्यासोबत नसलं, तरी विराट कोहली, रोहित शर्मा या खेळाडूंचा परिवार युएईमध्ये त्यांच्यासोबत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याची निवड झाल्यानंतर खेळाडूंच्या पत्नी आणि मुलांना भारतात परत यावं लागेल, तर खेळाडू तिकडूनच ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचल्यावर खेळाडूंना क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या