Home /News /sport /

कॅप्टनपदावरून हटवल्यानं विराट कोहली नाराज! 'या' कारणामुळे चर्चा तर होणारच...

कॅप्टनपदावरून हटवल्यानं विराट कोहली नाराज! 'या' कारणामुळे चर्चा तर होणारच...

विराट कोहली (Virat Kohli) आता टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन नाही. बीसीसीआयनं ही जबाबदारी आता रोहित शर्मावर (Rohit Sharma) सोपवली आहे. विराट कोहली या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा आहे.

    मुंबई, 13 डिसेंबर : विराट कोहली (Virat Kohli) आता टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन नाही. बीसीसीआयनं ही जबाबदारी आता रोहित शर्मावर (Rohit Sharma) सोपवली आहे. विराट कोहली या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणारे टीम इंडियाचे खेळाडू रविवारी मुंबईत एकत्र आले. मात्र पहिल्या दिवशी विराट टीम इंडियात दाखल झाला नाही, विराटच्या या कृतीमुळे तो नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. टीम इंडियाचे खेळाडू सोमवारपासून तीन दिवस क्वारंटाईन असतील. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी टीम जोहान्सबर्गसाठी रवाना होईल. भारतीय क्रिकेट टीमचे सदस्य रविवारी मुंबईतील हॉटेलमध्ये दाखल झाले,. पण, टीमला अद्याप त्यांच्या टेस्ट टीमच्या कॅप्टनची प्रतीक्षा आहे. विराट कोहलीला स्पष्ट सूचना दिल्यानंतरही तो रविवारी टीम इंडियाच्या कँपमध्ये दाखल झाला नाही, तो सोमवारी दाखल होईल, अशी आशा बीसीसीआय अधिकाऱ्यानं व्यक्त केली आहे. इनसाईड स्पोर्ट्सनं हे वृत्त दिलंय. निवड समितीमधील सदस्य आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी विराटला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने फोन उचलला नाही तसंच त्याला उत्तरही दिले नाही, असे वृत्त आहे. यापूर्वी विराटचा फोन बंद असल्याचा दावा त्याचे पूर्वीचे कोच राजकूमार शर्मा यांनी केला होता. VIDEO: ऑस्ट्रेलियात आंद्रे रसेलचे वादळ, फक्त 6 बॉलमध्ये ठोकले 34 रन! अद्याप रोहितचे अभिनंदन नाही विराट कोहलीनं अद्याप रोहित शर्माचं त्याच्या निवडीसाठी सोशल मीडियावरून अभिनंदन केलेले नाही, याकडे क्रिकेट फॅन्सनी लक्ष वेधलं आहे. विराटने रविवारी युवराज सिंहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, ऋषभ पंत आणि शार्दूल ठाकूर हे खेळाडू कँपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी टीम इंडियाचे बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांच्यासोबत सरावही केला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, Virat kohli

    पुढील बातम्या