टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ लवकरच जाहीर होणार, 'या' प्रशिक्षकांना मिळणार नारळ?

मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची फेरनियुक्ती झाली असून आता सपोर्ट स्टाफ निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 06:44 AM IST

टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ लवकरच जाहीर होणार, 'या' प्रशिक्षकांना मिळणार नारळ?

मुंबई, 20 ऑगस्ट : भारताच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. आता सपोर्ट स्टाफची निवड लवकरच कऱण्यात येणार असून याबाबत 22 ऑगस्टला जाहीर केले जाणार आहे. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट सल्लागार समितीनं मुख्य प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफ निवडण्याची परवानगी मागितली होती. मात्र, ही मागणी फेटाळून लावण्यात आली.

टीम इंडियासाठी सपोर्ट स्टाफ निवडण्याची जबाबदारी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती करणार आहे. ही निवड प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. 22 ऑगस्टला सपोर्ट स्टाफमधील नावे जाहीर केली जातील. त्याच दिवशी भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गुरुवारी सपोर्ट स्टाफची निवड प्रक्रिया पूर्ण होईल. त्याच दिवशी नावे जाहीर केली जातील. बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफची निवड मुख्य निवडकर्त्यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यांची समिती करते. तर मुख्य प्रशिक्षकाची निवड क्रिकेट सल्लागार समिती करते.

भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण संघासोबत राहू शकतात. पुन्हा त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या गोलंदाजीत मोठी सुधारणा झाली आहे. फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर यांची कामगिरी जबरदस्त असली तरी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि महान क्षेत्ररक्षक जॉन्टि ऱ्होड्स यांचे आव्हान आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची श्रीधर यांच्या नावाला पसंती आहे. त्यामुळं ऱ्होड्स यांचे नाव मागे पडू शकते.

फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांचे स्थान मात्र धोक्यात आलं आहे. भारताची फलंदाजी सर्वोत्तम असली तरी चौथ्या क्रमांकाचा प्रश्न भारताला सोडवता आलेला नाही. यामुळं बांगर यांना किंमत चुकवावी लागेल. फलंदाजीच्या प्रशिक्षकासाठी विक्रम राठोड आघाडीवर असल्याचं म्हटलं जात आहे. राहुल द्रविडची त्यांच्या नावाला पसंती आहे. राठोड यांना इंडिया ए च्या फलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विक्रम राठोड यांच्याशिवाय मार्क रामप्रकाश, अमोल मजूमदार, ऋषिकेष कानिटकर, प्रविण आमरे, लालचंद राजपूत, थिल्लन समरावीरा यांनीही अर्ज केले आहेत.

Loading...

महापुरात छतावर अडकलेल्या बकऱ्यांची सुटका, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 20, 2019 06:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...