Home /News /sport /

World Test Championship: टीम इंडियाची आज निवड, 'या' मुंबईकरला मिळणार पुन्हा संधी

World Test Championship: टीम इंडियाची आज निवड, 'या' मुंबईकरला मिळणार पुन्हा संधी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड (India vs England) मालिकेकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    मुंबई, 7 मे : आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर पुढच्या महिन्यात होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) स्पर्धेची फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या भारत-इंग्लंड (India vs England) मालिकेकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या दोन्ही मालिकेसाठीच्या टीम इंडियाची आज (शुक्रवारी) निवड होणार आहे. सुमारे चार महिन्यांच्या या इंग्लंड दौऱ्यासाठी कोरोना परिस्थिती लक्षात घेता 25 सदस्यांच्या जम्बो टीमची निवड समिती घोषणा करण्याची शक्यता आहे. पृथ्वी शॉ ला मिळणार संधी? मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर टीममधून हकालपट्टी करण्यात आली होती.  टीम इंडियातून वगळल्यानंतर पृथ्वीची कामगिरी सातत्यानं चांगली होत आहे. त्यानं विजय हजारे स्पर्धेत सर्वाधिक रनचा विक्रम केला. तर या आयपीएल सिझनमध्ये  आठ मॅचमध्ये 166.48 च्या स्ट्राईक रेटनं 308 रन काढले आहेत. या चांगल्या कामगिरीमुळे एक अतिरिक्त ओपनर म्हणून पृथ्वी शॉ ची टीममध्ये निवड होण्याची शक्यता आहे. टीम इंडियातील सध्याचा ओपनर शुभमन गिलची (Shubman Gill) कामगिरी खराब होत असून त्याच्या जागेवर पृथ्वीची निवड होऊ शकते. या जागेसाठी पृथ्वीचा दिल्ली कॅपिटल्सचा सहकारी शिखर धवन (Shikhar Dhawan) देखील शर्यतीमध्ये आहे. हार्दिकची होणार हकालपट्टी? या आयपीएल सिझनमध्ये रन काढण्यासाठी झगडणारा मुंबई इंडियन्सचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) टीम इंडियातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. हार्दिककडे टी20 क्रिकेटमध्ये बॉलिंग करण्याचा फिटनेस अजून नाही. त्यातच रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आता पूर्ण फिट आणि फॉर्मात असल्यानं हार्दिकची हकालपट्टी निश्चित मानली जात आहे. 'हा' असेल नवा चेहरा इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय टीममध्ये प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) हा नवा चेहरा असण्याची शक्यता आहे. प्रसिद्धनं इंग्लंड विरुद्धच्या वन-डे मालिकेत अनेकांना प्रभावित केलंय. त्यामुळे नवदीप सैनीच्या जागी प्रसिद्ध इंग्लंडला जाणार असं मानलं जातंय संभाव्य भारतीय टीम : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुभमन गिल/पृथ्वी शॉ/ शिखर धवन, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, वृद्धीमान साहा, अक्षर पटेल, केएल राहुल, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी / प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Hardik pandya, India vs england, Prithvi Shaw, Team india

    पुढील बातम्या