गब्बरमुळे टीम इंडियात 'या' खेळाडूवर होतोय अन्याय?

गब्बरमुळे टीम इंडियात 'या' खेळाडूवर होतोय अन्याय?

भारताचा सलामीवीर शिखर धवन वर्ल्ड कपदरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरला असून त्यानं पुनरागमन केलं आहे.

  • Share this:

त्रिनिदाद, 14 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील 3 एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी त्रिनिदादमध्ये होणार आहे. विंडीज दौऱ्यावर भारताचा सलामीवीर शिखर धवन सलग चार सामन्यात अपयशी ठरला आहे. टी20 मालिकेत धवननं 3 सामन्यात 27 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं दोन धावा केल्या. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर धवनला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला दोन वेळा शेल्डन कॉट्रेलनं बाद केलं.

सलामीला खेळणाऱ्या शिखर धवनमुळं केएल राहुलला संघात स्थान मिळू शकले नाही. वर्ल्ड कपमध्ये हे दोघेही टीम इंडियात होते. त्यावेळी धवन सलामीला तर राहुल चौथ्या क्रमांकावर उतरला होता. धवन दुखापतीनं बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी केएल राहुल खेळला. मात्र, आता संघ व्यवस्थापन दोघांऐवजी फक्त एकालाच संधी देत आहे. वर्ल्ड कपमध्ये रोहित आणि विराटनंतर केएल राहुलनं भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. राहुलला टी20 आणि वनडे मालिकेत बाहेर ठेवण्यात आलं आहे.

केएल राहुल गेल्या दोन वर्षांपासून टी20 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याच्याऐवजी मनिष पांडेला संधी मिळाली. पहिले दोन टी20 जिथं खेळले त्या मैदानावर केएल राहुलनं टी20 कारकिर्दीतील पहिलं शतक केलं होतं. त्यामुळं राहुलला संधी न मिळाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

शिखर धवन 33 वर्षांचा असून केएल राहुल 27 वर्षांचा आहे. भारताला पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी तयारी करताना धवनऐवजी केएल राहुलला संधी द्यायला हवी पण असे झाले नाही.

राहुलनं आयपीएलमध्ये गेल्या दोन वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना त्यानं सलामीला फलंदाजी केली आहे. आयपीएल 2019 च्या हंगामात त्यानं 14 सामन्यात 593 धावा केल्या होत्या. यात एक शतक 6 अर्धशतकाचा समावेश आहे. तर 2018 मध्ये 14 सामन्यात 659 धावा केल्या होत्या. यामध्ये 6 अर्धशतकं केली होती. याशिवाय आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2 शतकांचा समावेश आहे. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 4 शतकं केली आहेत.

तुम्ही पाहू नाही शकणार असा VIDEO, शाळेच्या संचालकाने विद्यार्थ्यांना केली बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 14, 2019 09:00 AM IST

ताज्या बातम्या