S M L

अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या यंग बिग्रेडचं मुंबईत जंगी स्वागत

तसंच बीसीसीआयने मुंबई या टीमचा भव्य सत्कारही केलाय.

Sachin Salve | Updated On: Feb 5, 2018 11:10 PM IST

अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या यंग बिग्रेडचं मुंबईत जंगी स्वागत

05 फेब्रुवारी : न्यूझीलंडमध्ये आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप जिंकून आलेल्या भारतीय यंग बिग्रेडचा मुंबईत शानदार स्वागत करण्यात आलंय. तसंच बीसीसीआयने मुंबई या टीमचा भव्य सत्कारही केलाय.

मुंबईतील जेज मेरियट हाॅटेलमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी कोच राहुल द्रविडसह सर्व खेळाडू हजर होते.

गेल्या 15-16 महिन्यांपासून आम्ही वर्ल्डकपसाठी तयार केली होती. याच दरम्यान चांगल्या खेळाडूंची निवड करण्यात आली. आम्ही न्यूझीलंडमध्ये चांगलं खेळलो आणि चॅम्पियन झालो. हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे अशी भावना राहु द्रविडने व्यक्त केली.पाकिस्तानविरुद्ध सामन्यात कोणतंही खास प्लॅनिंग करण्यात आलं नव्हतं. पण खेळाडूंवर दबाव होता. पाकविरुद्ध खेळाडूंनी दबावात असतानाही चांगला खेळ केला आणि विजय मिळवला असंही द्रविड म्हणाला.

तसंच राहुल द्रविडने टीमच्या विजयाचं श्रेय खेळाडूंना दिलं. ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय या विजयावरच त्यांचा हक्क आहे. आम्ही फक्त त्यांना साथ दिली असंही द्रविड म्हणाला.  आयपीएलचा लिलाव सुरू होता त्यामुळे खेळाडूंचं लक्ष विचलित होण्याची भीती होती. मी त्यांना खेळावर लक्षकेंद्रीत करण्याचं सांगितलं. आयपीएल दरवर्षी होईल पण वर्ल्डकपची संधी आताच आहे असा सल्ला दिला होता, खेळाडूंनीही कोणताही दबाव न ठेवता उत्तम खेळ केला असंही द्रविडने आवर्जून सांगितलं.

तर कॅप्टन पृथ्वी शाॅने मराठीतून संवाद साधला. आपल्या विजयाचं श्रेय त्याने वडिलांना दिलं. त्यांनी माझ्या खेळासाठी खूप प्रयत्न केले, हाल अपेष्टा सहन केल्यात हा माझ्या यशाचं सारं श्रेय हे त्यांना जातं असं पृथ्वी शाॅ म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2018 11:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close