टीम इंडियात विराटचे राज्य, प्रशिक्षकपदाची माळ रवी शास्त्रींच्याच गळ्यात?

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी लवकर मुलाखत होणार असून 6 दिग्गज या शर्यतीत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 11:14 AM IST

टीम इंडियात विराटचे राज्य, प्रशिक्षकपदाची माळ रवी शास्त्रींच्याच गळ्यात?

मुंबई, 01 ऑगस्ट : भारताच्या प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयनं अर्ज मागवले होते. त्याची मुदत संपल्यानंतर आता मुलाखत होणार आहे. असे असले तरी रवी शास्त्री पुन्हा प्रशिक्षक होऊ शकतात असं म्हटलं जात आहे. त्यांना दोन वर्ष मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपनंतर त्यांचा करार संपला होता मात्र विंडीज दौऱ्यापर्यंत तो वाढवण्यात आला. सध्याचे प्रशिक्षक असल्याने त्यांना संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार शास्त्रींना 2021 पर्यंत पुन्हा प्रशिक्षक केलं जाऊ शकतं. कर्णधार विराट कोहलीसह संघातील खेळाडूदेखील शास्त्री प्रशिक्षक व्हावं या मताचे आहेत. विंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं सांगितंल होतं की, पुन्हा एकदा शास्त्री प्रशिक्षक झाल्यास आनंद होईल. पुढच्या दोन वर्षात भारतीय संघाला आय़सीसी कसोटी चॅम्पियनशिप आणि टी20 वर्ल्ड कप खेळायचा आहे.

शास्त्रींना प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत टक्कर देईल अशी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे टॉम मूडी. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू असलेले टॉम मूडी सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगचे संचालक आहेत. तसेच ते आयपीएलच्या फ्रँचाइजीसोबत काम करतात. मूडी यांनी 2007 मध्ये राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी लीगमधील संघासोबत काम केलं आहे.

मुख्य प्रशिक्षकाशिवाय गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांचाही कार्यकाळ वाढण्याची शक्यता आहे. तर फील्डिंग प्रशिक्षक आर श्रीधर यांच्या नावाबाबत संभ्रम आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॉन्टी ऱ्होडस यांनी अर्ज केल्यानं त्यांच्याकडं फील्डिंग प्रशिक्षकपदाची जबाबदारी जाऊ शकते.

लंकेचा माजी क्रिकेटपटू माहेला जयवर्धने प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत आहे. जयवर्धनेनं अर्ज केला असला तरी सध्या मुंबई इंडियन्ससोबत असल्यानं तो उत्सुक नसल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्याशिवाय टॉम मूडी, माइक हसन, रॉबिन सिंग, लालसिंग राजपूत यांनीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.

Loading...

SPECIAL REPORT : 'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक सिद्धार्थ यांनी का उचलले टोकाचे पाऊल?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 11:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...