WTC Final : ऑस्ट्रेलिया गाजवल्यानंतर इंग्लंडमध्येही पंत फॉर्मात, न्यूझीलंडला दिला इशारा!

भारतीय क्रिकेट टीमने (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी (WTC Final) शुक्रवारी साऊथम्पटनमध्ये जोरदार सराव केला.

भारतीय क्रिकेट टीमने (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी (WTC Final) शुक्रवारी साऊथम्पटनमध्ये जोरदार सराव केला.

  • Share this:
    साऊथम्पटन, 12 जून : भारतीय क्रिकेट टीमने (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी (WTC Final) शुक्रवारी साऊथम्पटनमध्ये जोरदार सराव केला. भारत आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या या लढतीसाठी आता फक्त आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्वत:ला सज्ज करण्यासाठी एक इंट्रा स्क्वाड मॅचही खेळली. या मॅचमध्ये ऋषभ पंतनं (Rishabh Pant) जोरदार बॅटींग केली. ऋषभ पंतनं या मॅचमध्ये अर्धशतक झळकावत फॉर्मात असल्याचं दाखवून दिले. या मॅचमध्ये बॅट्समन आणि बॉलर्सच्या दोन वेगळ्या टीम करण्यात आल्या होत्या या प्रॅक्टीस मॅचमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि शुभमन गिल हे एका टीममध्ये होते. तर आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,  इशांत शर्मा हे दुसऱ्या टीममध्ये होते. भारतीय बॉलर्सनीही यावेळी जोरदार सराव केला. टीम इंडिया फायनलमध्ये कोणत्याही प्रॅक्टीस मॅचशिवाय उतरणार आहे. भारतीय खेळाडू यापूर्वी मुंबईमध्ये आयसोलेशनमध्ये होते. त्यानंतर इंग्लंडमध्ये त्यांना क्वारंटाईन राहावे लागले. तीन दिवसांच्या कठोर आयसोलेशननंतर खेळाडूंना एकमेकांना भेटण्याची परवानगी मिळाली. रोहितच्या सहकाऱ्याची कमाल, धोनीचा 15 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला न्यूझीलंडची टीम फायनलपूर्वी इंग्लंड विरुद्ध दोन टेस्टची माालिका खेळत आहे. या मालिकेमुळे न्यूझीलंडच्या सर्व प्रमुख खेळाडूंना इंग्लंडमधील वातावरणात टेस्ट खेळण्याचा सराव झाला आहे. या कारणामुळे 18 जून पासून सुरू होणाऱ्या मॅचमध्ये न्यूझीलंडचं पारडं जड आहे, असं  भाकित काही क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published: