मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /शिखर धवन झाला मुलाच्या आठवणीने भावुक, Photo शेअर करत म्हणाला, बाळा...

शिखर धवन झाला मुलाच्या आठवणीने भावुक, Photo शेअर करत म्हणाला, बाळा...

टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan) साठी गेले काही महिने त्रासदायक ठरले आहेत. या त्रासदायक कालखंडात धवन त्याच्या मुलाच्या आठवणीने भावुक झाला आहे.

टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan) साठी गेले काही महिने त्रासदायक ठरले आहेत. या त्रासदायक कालखंडात धवन त्याच्या मुलाच्या आठवणीने भावुक झाला आहे.

टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan) साठी गेले काही महिने त्रासदायक ठरले आहेत. या त्रासदायक कालखंडात धवन त्याच्या मुलाच्या आठवणीने भावुक झाला आहे.

मुंबई, 11 डिसेंबर : टीम इंडियाचा क्रिकेटपटू शिखर धवन (Shikhar Dhawan) साठी गेले काही महिने त्रासदायक ठरले आहेत. टी20 वर्ल्ड कपमधील टीममध्ये (T20 World Cup 2021)  त्याची निवड करण्यात आली नव्हती. त्याचबरोबर त्याचा पत्नी आयशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) बरोबर घटस्फोट झाला आहे. शिखर या सर्व संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी तो मुलाच्या आठवणीने भावुक झाला आहे.

शिखर धवननं त्याच्या मुलासोबत झालेल्या व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामुळे धवन आणि त्याचा मुलगा जोरावर यांनी एकासारखीच हेअर स्टाईल केलेली दिसत आहे. या फोटोला धवनने 'जसा बाप तसाच मुलगा. बाळा, मला तुझी आठवण येते.' असं कॅप्शन दिले आहे.

शिखर धवनचा मुलगा जोरावरचा जन्म 2015 साली झाला. त्याचे मुलाशी जबरदस्त बॉन्डिंग आहे. यापूर्वीच्या अनेक फोटो आणि व्हिडीओमधून ते दिसले आहे. धवनने 2012 साली ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आयशा मुखर्जीशी लग्न केले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे 9 वर्षांचे नाते संपुष्टात आले. त्यानंतर जोरावर आईसोबत ऑस्ट्रेलियात राहत आहे.

IND vs SA : राहुल द्रविडच्या एका सल्ल्यामुळे वाचलं करिअर, आता गाजवणार दक्षिण आफ्रिका दौरा

शिखर धवन सध्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीकडून खेळत आहे. या स्पर्धेत त्याची सुरूवात खराब झाली आहे. झारखंड विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये तो 3 बॉल खेळून शून्यावर आऊट झाला. तर हैदराबाद विरुद्ध त्याने फक्त 12 रन काढले. 36 वर्षांच्या धवनची टी20 वर्ल्ड कपमध्ये निवड करण्यात आली नव्हती. तसंच त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या 3 मॅचच्या टी20 सीरिजमध्येही त्याला संधी मिळाली नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी टीम इंडियाची निवड अद्याप झालेली नाही. या टीममध्ये जागा मिळवण्यासाठी धवनसमोर खडतर आव्हान असून त्याला उर्वरित मॅचमध्ये दमदार खेळी करावी लागेल.

First published:
top videos

    Tags: Instagram post, Shikhar dhawan