INDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर!

वेस्ट इंडीजविरुद्धचा मालिकेसाठी विराट, बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता असून धोनी आणि धवन दुखापतीने मुकण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 03:25 PM IST

INDvsWI : विंडीजविरुद्ध लढणार नव्या दमाचे खेळाडू, ही नावे आघाडीवर!

ICC Cricket World Cup नंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा 19 जुलैला होणार असून निवड समितीच्या बैठकीत नव्या खेळाडूंना संधी देण्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळं वेस्ट इंडीज दौऱ्यावर नव्या दमाचे खेळाडू जातील. वर्ल्ड कपनंतर काही खेळाडूंना विश्रांती दिली जाईल. यात विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश असून महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन दुखापतीमुळे खेळण्याची शक्यता कमी आहे.

विराटला विश्रांती दिल्यास नेतृत्वाची धुरा रोहितच्या खांद्यावर असेल. याशिवाय अजिंक्य रहाणे आणि आर. अश्विन यांचे पुनरागमन होईल. तर युवा खेळाडूंना संघात जागा मिळवण्याची संधी मिळेल.

भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्याची सुरुवात टी20 मालिकेपासून होणार आहेय या संघात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरला जागा मिळू शकते. तर ऋषभ पंत आणि ईशान किशन हे यष्टीरक्षक म्हणून संघात असतील. तर गोलंदाज नवदीप सैनीला जागा मिळण्याची शक्यता आहे.

एकदिवसीय मालिकेसाठीसुद्धा संघात बदल होईल. विश्रांती दिलेल्या खेळाडूंच्याजागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल. यात श्रेयस अय्यर, नवदीप सैनी यांची नावे आघाडीवर आहे.

कसोटी मालिकेसाठी मयंक अग्रवालची निवड होऊ शकते. या संघात हनुमा विहारी आणि नवदीप सैनीला जागा मिळू शकतं.

Loading...

भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर 3 ऑगस्टपासून जाणार आहे. यात तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 03:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...