मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियाच्या 'भज्जी'ची किचनमध्ये कमाल, पाहा लज्जतदार VIDEO

टीम इंडियाच्या 'भज्जी'ची किचनमध्ये कमाल, पाहा लज्जतदार VIDEO

क्रिकेट फॅन्समध्ये 'भज्जी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरभजननं (Harbhajan Singh) मैदानात त्याच्या बोटांची जादू अनेकदा दाखवली आहे. नव्या व्हिडीओमध्ये तो किचनमधील कामातही तरबेज असल्याचे दिसत आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 6 जून: टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करतोच त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयावर प्रतिक्रिया देखील व्यक्त करतो. हरभजननं एक व्हिडीओ (Video) नुकताच शेअर केला आहे. त्यामध्ये छोले बनवण्याची पद्धत सांगितली आहे. त्याने स्वत: किचनमध्ये छोले बनवले आहेत. क्रिकेट फॅन्समध्ये 'भज्जी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हरभजननं मैदानात त्याच्या बोटांची जादू अनेकदा दाखवली आहे. 40 व्या वर्षीही क्रिकेटमध्ये सक्रीय असलेल्या हरभजनने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये तो उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रसिद्ध डिश छोले बनवत आहे. हरभजनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. अनेक फॅन्सनी हरभजनने तयार केलेले छोले खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हरभजननं त्याच्या करियरमध्ये 103 टेस्ट, 206 वन-डे आणि 28 आंतररष्ट्रीय टी 20 मॅच खेळल्या असून यामध्ये 700 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
धोनीसोबत अफेयर असल्याची होती ‘या’ अभिनेत्रीची चर्चा, HOT PHOTOS पाहून व्हाल थक्क हरभजन आयपीएल सिझन 14 मध्ये (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सदस्य आहे. आयपीएल स्थगित होण्यापूर्वी तो केकेआरकडून 3 मॅच खेळला. यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. हरभजनने आयपीएल कारकिर्दीमध्ये 150 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. तो यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा सदस्य होता. मागील वर्षी झालेल्या आयपीएलमधून (IPL 2020) हरभजनने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती.
First published:

Tags: Cricket, Harbhajan singh, Instagram post, Video Viral On Social Media

पुढील बातम्या