मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री शोधतायत नवी नोकरी, 'या' 2 करिअरवर आहे नजर

टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री शोधतायत नवी नोकरी, 'या' 2 करिअरवर आहे नजर

टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपत आहे. बीसीसीआयनं रविवारीच नव्या कोचसाठी अर्ज मागवले आहेत.

टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपत आहे. बीसीसीआयनं रविवारीच नव्या कोचसाठी अर्ज मागवले आहेत.

टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपत आहे. बीसीसीआयनं रविवारीच नव्या कोचसाठी अर्ज मागवले आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 18 ऑगस्ट: टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपत आहे. बीसीसीआयनं रविवारीच नव्या कोचसाठी अर्ज मागवले आहेत. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडचं (Rahul Dravid) नाव या पदासाठी सर्वात आघाडीवर आहे. अर्थात याबाबत अजून कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. याचवेळी रवी शास्त्री त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या करिअरच्या शोधात आहेत.

शास्त्रींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर कॉमेंट्रीमध्ये चांगलं नाव कमावलं होतं. 1994 साली श्रीलंका दौऱ्यात पहिल्यांदा कॉमेंट्री करणारे शास्त्री काही वर्षांमध्येच भारतीय क्रिकेटचा आवाज बनले होते. इंग्रजी वृत्तपत्र 'टाईम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या वृत्तानुसार शास्त्री एखाद्या आयपीएल टीमसोबत काम करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर टीव्ही ब्रॉडकास्टर म्हणूनही ते पुन्हा एकदा कॉमेंट्री करू शकतात.

रवी शास्त्री कोच असताना टीम इंडियानं 2016 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. त्याचबरो 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही सेमी फायनलमध्येच टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आले होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियानं प्रवेश केला होता. पण त्या स्पर्धेतही निर्णायक विजयानं टीमला हुलकावणी दिली होती.

T20 World Cup IND vs ENG: टीम इंडियाच्या 3 खेळाडूंची परीक्षा, चुकीला माफी नाही!

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी अटी

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी बीसीसीआयने काही नियम ठेवले आहेत. यामध्ये या पदासाठी किती अनुभव असला पाहिजे, यासाठीच्या अटींचा समावेश आहे.

- इच्छुक व्यक्ती कमीत कमी 30 टेस्ट किंवा 50 वनडे खेळलेला असावा.

- किंवा टेस्ट खेळणाऱ्या देशाचा कमीत कमी दोन वर्ष मुख्य प्रशिक्षक असला पाहिजे. किंवा

-क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा/आयपीएल टीम किंवा आंतरराष्ट्रीय लीग/प्रथम श्रेणी क्रिकेट/राष्ट्रीय ए टीमचा मुख्य प्रशिक्षक म्हणून 3 वर्षांचा अनुभव असावा.

किंवा

- बीसीसीआयचा लेव्हल 3 किंवा त्यासारखा कोचिंगचा कोर्स केलेली व्यक्ती अर्ज करू शकते.

- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असावं.

First published:

Tags: Cricket news, Ravi shastri, T20 world cup