23 वर्षांपूर्वी खेळल्या होत्या भारताच्या 2 टीम, वाचा काय होता तेव्हाचा निकाल

23 वर्षांपूर्वी खेळल्या होत्या भारताच्या 2 टीम, वाचा काय होता तेव्हाचा निकाल

भारतीय क्रिकेट टीम जेव्हा इंग्लंडमध्ये असेल तेव्हा आणखी एक टीम इंडिया श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाईल. भारतीय टीम एकाच वेळी दोन दौऱ्यांवर असण्याची ही दुसरी वेळ आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून: श्रीलंकेविरुद्ध जुलै महिन्यात होणाऱ्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखालील भारतीय टीम इंग्लंडमध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) झाल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहिल. 18 जून ते 22 जून या काळात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल, यानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्धची 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळतील. 4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होणार आहे. कोरोनाचं संकट आणि क्वारंटाईनचे नियम यामुळे भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतरही इंग्लंडमध्येच थांबणार आहे.

भारतीय टीम इंग्लंडमध्ये असतानाच जुलै महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी-20 सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी पूर्णपणे वेगळ्या टीमची निवड करण्यात आली आहे. अनुभवी बॅट्समन शिखर धवन (Shikhar Dhawan) या टीमचा कॅप्टन असून भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) व्हाईस कॅप्टन आहे. श्रीलंकेला जाणाऱ्या टीममध्ये सहा नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

एक देश, दोन टीम

याआधीही भारतीय टीम एकाच वेळी दोन दौऱ्यांवर गेली होती. 1998 साली पहिल्यांदा क्रिकेटला कॉमनवेल्थ (Commonwealth Games) खेळामध्ये सामील करण्यात आलं होतं, तर त्याचवेळी भारताला सहारा कपमध्येही (Sahara Cup) खेळायचं होतं. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वात भारतीय टीम सहारा कप खेळण्यासाठी गेली, तर अजय जडेजाच्या नेतृत्वात भारतीय टीम कॉमनवेल्थ खेळण्यासाठी गेली. जडेजाच्या टीममध्ये सचिन तेंडुलकर, रोहन गावसकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अनिल कुंबळे होते, तर अजहरच्या टीममध्ये सौरव गांगुलीला संधी मिळाली होती.

काय लागला होता निकाल?

कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय टीमचा ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अँटीग्वा यांच्यासह ग्रुप B मध्ये समावेश होता. यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला. कॅनडा विरुद्ध भारतीय टीमने विजय मिळवला. तर अँटीग्वा विरुद्धचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. एक विजय, एक पराजय आणि एक सामना रद्द झाल्याने भारतीय टीमचं आव्हान साखळी फेरीतच आटोपले.

सहारा कपमध्येही पराभव

कॉमनवेल्थ स्पर्धेत टीम इंडिया पराभूत झाल्यााने त्या टीममधील काही सदस्यांना कॅनडामधील सहारा कप स्पर्धेत खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. पाकिस्तानने त्याला विरोध केला. अखेर फक्त सचिन तेंडुलकर आणि अजय जडेजा या दोघांचा समावेश करण्यास पाकिस्तानने मान्यता दिली. त्याप्रमाणे अजय जडेजा सहारा कपमधील 3 सामने झाल्यानंतर भारताकडून खेळला. पण, सचिन कुटुंबासोबत आधीच सुट्टीवर गेला असल्याने वेळेवर पोहचू शकला नाही.

टीम इंडियाला धोक्याचा इशारा, विजेतेपदासाठी 'हा' अडथळा करावा लागणार पार

सचिन शेवटच्या मॅचसाठी कॅनडामध्ये पोहचला, पण तोपर्यंत पाकिस्तानने पाच सामन्यांच्या मालिकेत तीन सामने जिंकून विजयी आघाडी घेतली होती. अखेर पाकिस्तानने ती मालिका देखील 4-1 ने जिंकली.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 10:57 AM IST

ताज्या बातम्या