• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • विराट कोहली ठरला दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू, कपिल देव आणि सचिनलाही मोठा सन्मान

विराट कोहली ठरला दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू, कपिल देव आणि सचिनलाही मोठा सन्मान

टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा 2010 दशकातील सर्वश्रेष्ठ वन-डे क्रिकेटपटू ठरला आहे. ‘विस्डेन’ ने प्रतिष्ठेच्या Wisden Almanack पुरस्कारासाठी त्याची निवड केली आहे

 • Share this:
  मुंबई, 15 एप्रिल: टीम इंडियाचा (Team India) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) हा 2010 दशकातील सर्वश्रेष्ठ वन-डे क्रिकेटपटू ठरला आहे. ‘विस्डेन’ ने प्रतिष्ठेच्या Wisden Almanack पुरस्कारासाठी त्याची निवड केली आहे. 32 वर्षांच्या कोहलीनं ऑगस्ट 2008 साली श्रीलंकेच्या विरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सर्वकालीन सर्वश्रेष्ठ बॅट्समनमध्ये त्याचा समावेश होतो. विराटने आजवर 254 वन-डेमध्ये 12 हजार 659 रन काढले आहेत. पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय मॅचला 50 वर्ष होत असल्याच्या निमित्तानं विस्डेननं प्रत्येक दशकातील पाच वन-डे क्रिकेटपटूंची निवड केली आहे. विराटची 2010 च्या दशकातील कामगिरीसाठी निवड करण्यात आली आहे. 2011 साली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाचा विराट सदस्य होता. त्यानं 10 वर्षात 11 हजार पेक्षा जास्त रन काढले असून यामध्ये 42 सेंच्युरींचा समावेश आहे. कपिल आणि सचिनचा मोठा सन्मान महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला 90 च्या दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू निवडण्यात आलं आहे. सचिननं 1998 या एकाच वर्षात 9 वन-डे सेंच्युरी झळकावल्या होत्या. वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कॅप्टन कपिल देव (Kapil Dev) यांची 80 च्या दशकातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कॅप्टनीमध्ये भारताने 1983 साली वर्ल्ड कप जिंकला होता. त्यांनी 80 च्या दशकात सर्वात जास्त विकेट्स घेतल्या तसंच सर्वात जास्त स्ट्राईक रेटनं 1 हजार पेक्षा जास्त रन बनवले होते. 6 बॉलमध्ये बदललं मॅचचं चित्र, थरारक लढतीमध्ये विराट कोहलीच्या टीमचा विजय इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सची (Ben Stokes) सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीला सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटपटू म्हणून तर वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डची सर्वश्रेष्ठ T20 क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: