कॅप्टन विराट कोहली ‘या’ कारणांमुळे आला अडचणीत, सोडावं लागू शकते पद

कॅप्टन विराट कोहली ‘या’ कारणांमुळे आला अडचणीत, सोडावं लागू शकते पद

BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यावरही अशाच प्रकारचे आक्षेप घेण्यात आले आहेत. पण गांगुली यांनी हे सर्व आक्षेप फेटाळले असून यात काहीही चुकीचं नाही असं स्पष्टिकरण दिलं आहे.

  • Share this:

मुंबई 5 जुलै: कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) क्रिकेट सध्या ठप्प झालं आहे. सर्वच खेळाडू मैदावर कधी जाता येईल याची प्रतिक्षा करत आहेत. मात्र खेळ पुन्हा कधी सुरू होईल हे अजुनही कुणालाच सांगता येत नाही. त्यामुळे सगळीकडेच अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यातच आता भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) अडचणीत आला आहे. भारतीय संघाचा कॅप्टन असतानाची सार्वजनिक लाभ घेत असल्याची तक्रार संजीव गुप्ता यांनी BCCIच्या लोकपालांकडे केली आहे.

टाइम्‍स ऑफ इंडियाने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. विराट कोहली हा भारतीय संघाचा कॅप्टन आहे. या पदावर असतानाही तो जाहीराती आणि इतर अनेक आर्थिक कामांमध्ये गुंतला आहे. एका पदावर असतांना असे लाभ घेता येत नाही असं संजीव गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे.

लोढा समितीच्या शिफारसी आणि मार्गदर्शक तत्वांनुसार क्रिकेटपटूंना BCCIमधून मिळणारे आणि इतरही कंपन्यांकडून मिळाणारे लाभ तो घेऊ शकत नाही असा त्यांचा दावा आहे.

81 वर्षीय आईचा VIDEO शेअर करीत मिलिंदने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असलेले संजिव गुप्ता हे BCCIच्या घटनेचे जाणकार समजले जातात त्यांनी या आधीही अशाच प्रकारची प्रकरणं पुढे आणली होती. विराट हा दोन पदांवर नियुक्त असून असं करणं हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आणि BCCIच्या 38 (4) या  नियमांचं उल्लंघन असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

...अन्यथा मला किडनी विकावी लागेल; अर्शद वारसीच्या त्या ट्विटमागे काय आहे कारण

BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यावरही अशाच प्रकारचे आक्षेप घेण्यात आले आहेत. गांगुलीने आपल्या इंस्टाग्राम वर एक फोटो टाकत स्वत:ला जेएसडब्ल्यू सीमेंटचा (JSW Cements) Brand Ambassador असल्याचं म्हटलं होतं. जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सकडे (JSW Sports) IPLच्या दिल्ली टीमचा मालकी हक्क आहे. पण गांगुली यांनी हे सर्व आक्षेप फेटाळले असून यात काहीही चुकीचं नाही असं स्पष्टिकरण दिलं आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: July 5, 2020, 4:44 PM IST

ताज्या बातम्या