मुंबई, 10 मे : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यानं इंग्लंड दौऱ्याच्या पूर्वी कोरोना लसीचा (Corona Vaccine) पहिला डोस घेतला आहे. टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी यापूर्वीच पहिला डोस घेतला आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) हे लस घेणारे भारतीय क्रिकेट टीमचे पहिले सदस्य होते. त्यांनी मार्च महिन्यातच पहिला डोस घेतला आहे.
विराटनं कोरोना लस घेतल्याचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याचबरोबर सर्वांना लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन केलं आहे. 'कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या सर्वांनी तातडीनं लस घ्यावी. त्यामुळे या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मदत होईल.' असं आवाहन विराटनं केलं आहे.
टीम इंडियाचा फास्ट बॉलर इशांत शर्मा (Ishant Sharma) यानं देखील त्याच्या पत्नीसह कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. इशांतनं ट्विट करुन याची माहिती दिली. त्याचबरोबर त्यानं लस देण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांचे आभार मानले असून सर्वांना लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन केलं आहे.
Thankful for this and grateful for all the essential workers. Happy to see the smooth running of the facility & management. Let’s all get vaccinated at the earliest. #GetVaccinated #CovidVaccine pic.twitter.com/3wRHeBwvTP — Ishant Sharma (@ImIshant) May 10, 2021
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि त्याची पत्नी राधिका यांनी कोरोना लसीचा पहिला डोस काही दिवसांपूर्वी घेतला. 'मी आणि राधिका, दोघांनी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, आम्ही फक्त स्वत:साठीच नाही तर आसपासच्या लोकांसाठीही लस घेत आहोत. तुम्हीही कोरोनाची लस नक्की घ्या.' असं आवाहन त्यानं यावेळी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Team india, Virat kohli