विराट कोहलीसाठी आजचा दिवस आहे खास, 10 वर्षांपूर्वी घडला होता इतिहास

विराट कोहलीसाठी आजचा दिवस आहे खास, 10 वर्षांपूर्वी घडला होता इतिहास

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी (Virat Kohli) आजचा दिवस खूप खास आहे. दहा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजे 20 जून 2011 रोजी त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

  • Share this:

मुंबई, 20 जून : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसाठी (Virat Kohli) आजचा दिवस खूप खास आहे. दहा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजे 20 जून 2011 रोजी त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विराट पहिल्या इनिंगमध्ये फक्त 10 बॉल खेळून 4 रन काढून आऊट झाला होता. त्यावेळी तो भविष्यात टीम इंडियाचा महान बॅट्समन आणि सर्वात यशस्वी कॅप्टन बनेल याची कुणीही कल्पना केली नव्हती. विराट सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) खेळत आहे. ही फायनल जिंकून या क्षणाला आणखी संस्मरणीय करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

विराटनं काही दिवसांपूर्वी ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना या प्रवासाबद्दल सांगितले होते. “टीम इंडियाच्या एका फॉरमॅटचाही कॅप्टन होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. आज मी तीन्ही फॉरमॅटचा कॅप्टन आहे. हा अविश्वसनीय प्रवास आहे. टीमची कामगिरीमध्ये अनेक चढ-उतार आले. यश आणि अपयश दोन्ही मिळाले. पण प्रत्येक वेळी टीमला 100 टक्के योगदान मी दिले आहे.”

पालकांना दिला सल्ला

विराटनं अंडर 19 टीमचा कॅप्टन ते टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन असा मोठा प्रवास पूर्ण केला आहे. या अनुभवातून खूप काही शिकल्याचं त्यानं सांगितलं. “मला संधी मिळेल तेव्हा मुलांशी बोलायला आवडते. आई-वडिलांनी मुलांच्या मनातील गोष्ट समजून घेतली पाहिजे. त्यांना कठीण काळामध्ये पाठिंब्याची गरज असते. त्या परिस्थितीमध्ये मुलांवर दबाव टाकू नये.

अनेकदा क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटमधील खराब प्रदर्शनानंतर कमबॅक करु शकत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्यावर सर्व बाजूने दबाव असतो. स्टारडम ही थोड्या काळासाठी असलेली गोष्ट आहे. व्यक्ती कधीही बदलत नाही.”  असा सल्ला विराटनं यावेळी दिला.

विराटने दुसऱ्या इनिंगमध्येही बॅटिंग करावी, चाहत्यांची मागणी, कारण आहे खास

अर्धशतकांपेक्षा शतक जास्त

विराट कोहलीनं 92 टेस्टमधील 154  इनिंगमध्ये 53 च्या सरासरीनं 7534 रन काढले आहेत. यामध्ये 27 शतक आणि 25 अर्धशकांचा समावेश आहे. त्याने टेस्टमध्ये अर्धशतकांपेक्षा जास्त शतक लगावले आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन म्हणूनही त्याने सर्वात जास्त रन काढले आहेत. विराटनं कॅप्टन म्हणून 99 इनिंगमध्ये 59 च्या सरासरीनं 5436 रन काढले आहेत. यामध्ये 20 शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत महेंद्रसिंह धोनी 3454 रनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Published by: News18 Desk
First published: June 20, 2021, 8:21 AM IST

ताज्या बातम्या