• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • आई - वडिलांचा सुरू आहे कोरोनाशी संघर्ष, युजवेंद्र चहलचं सर्वांना भावुक आवाहन

आई - वडिलांचा सुरू आहे कोरोनाशी संघर्ष, युजवेंद्र चहलचं सर्वांना भावुक आवाहन

युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या कठीण काळातून जात आहे. चहलच्या घरामध्ये सध्या कोरोनाचा (Covid-19) शिरकाव झाला आहे. त्याचे वडिल सध्या हॉस्पिटलमध्ये असून आईवर घरी उपचार सुरु आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 16 मे : क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाच्या बाहेर देखील अनेकदा आनंदी दिसणारा टीम इंडियाचा बॉलर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या कठीण काळातून जात आहे. चहलच्या घरामध्ये सध्या कोरोनाचा (Covid-19) शिरकाव झाला आहे. त्याचे वडिल सध्या हॉस्पिटलमध्ये असून आईवर घरी उपचार सुरु आहेत. चहलची पत्नी धनश्री वर्माच्या (Dhanashree Verma) काकूचं काही दिवसांपूर्वी कोरोनानं निधन झाले. सतत येत असलेल्या या संकटामुळे युजवेंद्र चहल हतबल झाला आहे. या वाईट काळातील भावना त्यानं सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. चहलनं त्याच्या कुटुंबाचा एका फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून 'तुमच्या जवळच्या व्यक्तींना जवळ ठेवा' असं भावुक आवाहन सर्वांना केलं आहे. संकाटातही कोरोनाग्रस्तांना मदत युजवेंद्र चहल यांचं कुटुंब सध्या कोरोनाग्रस्त आहे. या संकटाच्या प्रसंगातही त्यांना इतरांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बंगळुरुमधील कोरोना रुग्णांना मदत करणाऱ्या संस्थेला 2 लाख रुपयांची मदत चहलनं दिली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी चालवलेल्या अभियानात देखील चहलनं 95 हजार रुपये दान केले आहेत. 'कोरोनामुळे आई-बहिण गमावलेल्या वेदा कृष्णमूर्तीची BCCI नं विचारपूस केली नाही' धनश्रीनं दिली होती माहिती युजवेंद्र चहलच्या आई-वडिलांना कोरनाची लागण झाल्याची माहिती त्याची पत्नी धनश्री वर्मा हिनं दोन दिवसांपूर्वी दिली होती. माझ्या सासू-सासऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघंही गंभीर आहेत. सासरे हॉस्पिटलमध्ये असून सासूबाईंवर घरी उपचार सुरु आहेत. मी हॉस्पिटलमध्ये होते. मी खूप खराब अवस्था पाहिली आहे. मी पूर्ण काळजी घेत आहे. तुम्ही सर्व जण घरीच राहा आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या.' असं आवाहन तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं होतं.
  Published by:News18 Desk
  First published: