5 वर्षांनंतर भारताकडे अशी असेल फलंदाजांची फौज!

सध्या भारतीय संघातील आघाडीची फळी जगात सर्वोत्तम अशी आहे. येत्या 5 वर्षात यामध्ये नवीन खेळाडूसुद्धा येतील.

  • Share this:

वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर आहे. यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. सध्याच्या संघातील काही खेळाडू आगामी वर्ल्ड कपपूर्वी निवृत्त होतील.

2023 ला होणाऱ्या वर्ल्ड कपनंतरच्या संघात कदाचित विराट वगळता इतर अनुभवी खेळाडू नसतील. विराटचे वय सध्या 31 वर्ष आहे. रोहित शर्मा 32, धवन 33 वर्षांचा आहे. धोनी सध्या 38 वर्षांचा असून तो पुढच्या वर्ल्ड कपमध्ये दिसणार नाही.

भारतीय संघासमोर सध्या मधल्या फळीची चिंता आहे. आतापर्यंत अनेकदा चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीत वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. विंडीज दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा विचार करूनच संघाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षांत संघात नव्या दमाचे खेळाडू असतील.

भारताच्या आघाडीची धुरा सध्या रोहित आणि धवन यांच्यावर आहे. त्यांच्यानंतर ही जबाबदारी केएल राहुलच्या खांद्यावर जाईल. धवन सध्या 34 वर्षांचा आहे पुढच्या वर्ल्ड कपनंतर तोसुद्धा निवृत्त होईल. त्यामुळे सलामीला खेळण्यासाठी केएल राहुल दावेदार ठरू शकतो.

फॉर्ममध्ये असलेला हिटमॅन रोहित शर्माचा 2023 चा वर्ल्ड कप अखेरचाच असेल. त्याच्या जागी संघात पृथ्वी शॉला संधी मिळू शकते. कमी वयात आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या पृथ्वी शॉकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे.

कर्णधार विराट कोहलीचे वय आणि त्याचा खेळ पाहता तो पुढची पाच वर्षे तरी संघात आपले स्थान कायम ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तिसऱ्या स्थानी खेळणाऱा कोहली आपले स्थान कायम राखू शकतो.

भारत ए संघात खेळणाऱा शुभमन गिल जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याला विंडीज दौऱ्यावर संधी मिळाली नसली तरी तो चौथ्या क्रमांकाचा दावेदार ठरू शकतो. त्याशिवाय तो सलामीलासुद्धा खेळू शकतो.

आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरने आतापर्यंत भारताकडून 5 सामन्यात 210 धावा केल्या आहेत. यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. विंडीज दौऱ्यासाठीच्या संघात श्रेयस अय्यरला स्थान मिळालं आहे. त्यामुळं पाचव्या क्रमांकावर तो आपली दावेदारी सिद्ध करू शकतो.

भारतासमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे धोनीची जागा कोण घेणार? त्यामध्ये वृद्धीमान साहा, ईशान किशन, संजू सॅमसन यांना मागे टाकून यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतने बाजी मारली आहे. विंडीज दौऱ्यावर त्याची निवड कऱण्यात आली असून भविष्यात त्याच्याकडेच ही जबाबदारी असेल तसे संकेतही बीसीसीआयनं दिले आहेत.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने त्याच्या खेळात गेल्या सहा महिन्यात बदल केला आहे. तो भविष्यात 7 नंबरचा प्रबळ दावेदार ठरू शकतो. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी दिसली आहे. याशिवाय सध्या तो भारताच्या तीनही संघात खेळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 3, 2019 06:46 AM IST

ताज्या बातम्या