धोनीला 7 व्या क्रमांकावर पाठवण्याच्या निर्णयाबद्दल बॅटिंग कोचने केला खुलासा

वर्ल्ड कपमध्ये भारताला सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर पहिल्यांदाच फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 04:48 PM IST

धोनीला 7 व्या क्रमांकावर पाठवण्याच्या निर्णयाबद्दल बॅटिंग कोचने केला खुलासा

मुंबई, 02 ऑगस्ट : ICC Cricket World Cup स्पर्धेत साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी करणारा भारताचा संघ सेमीफायनलमध्ये मात्र न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर ढेपाळला. या पराभवानंतर भारताच्या संघ निवडीपासून ते सेमीफायनलमधील फलंदाजांच्या क्रमांकापर्यंत वाद निर्माण झाले. यावर आता पहिल्यांदाच भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू संजय बांगर 2014 पासून फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतात. त्यांनी 50 कसोटी आणि 119 एकदिवसीय सामन्यात प्रशिक्षण दिलं आहे. भारताने चांगली फलंदाजी केली मात्र मोक्याच्या क्षणी ढेपाळले असं त्यांनी सांगितलं.

वर्ल्ड कपमधील भारताच्या फलंदाजीचं बांगर यांनी कौतुक केलं. भारताने अखेरच्या पाच षटकांत अनेक चुका केल्याचंही त्यांनी मान्य केलं. संपूर्ण स्पर्धेत इंग्लंडनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्व खेळाडूंची सरासरी चांगली असून 7 शतकं आणि 12 अर्धशतकं संघाच्या नावावर आहेत. सेमीफायनल वगळता सर्वच सामन्यात जबरगस्त कामगिरी केली आहे.

वर्ल्ड कपदरम्यान अचानक विजय शंकरला दुखापतीने बाहेर पडावं लागलं. त्यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. त्याबाबत बांगर म्हणाले की, शंकरला 19 जून रोजी दुखापत झाली. त्यानंतर 22 आणि 27 जूनला तो खेळला. मात्र 30 जूनच्या सामन्यात तो गोलंदाजी करू शकत नव्हता. तेव्हाच केएल राहुल दुखापत ग्रस्त झाला. त्यावेळी संघ व्यवस्थापनाने राहुलला पर्यायी व्यवस्था म्हणून सलामीवीर संघात असावा असा विचार केला. त्यानंतर विजय शंकरच्या दुखापतीचे अपडेट आले आणि त्याच्या जागी मयंक अग्रवालला बोलावण्यात आलं असं बांगर यांनी सांगितलं.

भारत 'ए' 190 धावात गारद, दुसऱ्या डावात विंडीजच्या घसरगुंडीने सामन्यात रंगत

धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. त्याबद्दल बांगर म्हणाले की, हा माझा एकट्याचा निर्णय नव्हता. सर्व परिस्थितीचा विचार करून धोनीला सातव्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 35 षटकानंतर होत असलेली पडझड थांबवणं आणि धावगती वाढवण्याची जबाबदारी धोनीवर देण्यात आली होती. याबद्दल कोहलीनेसुद्धा याआधी सांगितलं होतं. तसेच सेमीफायनलमध्ये सुरुवातीच्या विकेट लवकर गमावल्यानं दिनेश कार्तिकला वरती पाठवण्यात आलं. पण तोसुद्धा लवकर बाद झाल्यानं शेवटी धोनीवरच सगळं ओझं पडल्याचं संजय बांगर म्हणाले.

Loading...

'...हा तर मूर्खपणा', ICC वर भडकला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू

बीसीसीआयने प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते. याशिवाय सपोर्टिंग स्टाफमधील काही पदांसाठीसुद्धा अर्ज मागवले होते. यामध्ये सध्या पदावर असलेल्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नसल्याचंही बीसीसीआयने त्यांच्या प्रेसनोटमध्येच लिहलं आहे. रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली 2014 पासून आम्ही काम करत आहे. या काळात भारताने 50 पैकी 28 कसोटीत विजय मिळवला. तसेच 120 एकदिवसीय सामन्यापैकी 80 मध्ये विजय मिळवला आहे. आयसीसी रँकिंगमध्ये भारत गेल्या तीन हंगामापासून पहिल्या क्रमांकावर असल्याचंही बांगर यांनी सांगितलं.

प्रेक्षकांनी रडवलं पण त्यानं जिंकलं मैदान, सचिन-विराटलाही टाकलं मागे

Ashes : कसोटीच्या पहिल्याच दिवशी पंचांचे 7 निर्णय चुकले!

'SUPER 30'चा पार्ट 2: 75 दुणे...अचूक पाढे म्हणाऱ्या'सुपर आजी',एकदा VIDEO पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 01:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...