मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final: इंग्लंड दौऱ्यापूर्वी रविंद्र जडेजा करतोय खास तयारी, VIDEO VIRAL

WTC Final: इंग्लंड दौऱ्यापूर्वी रविंद्र जडेजा करतोय खास तयारी, VIDEO VIRAL

टीम इंडिया (Team India) पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या दौऱ्याच्या तयारीला लागलाय. जडेजानं काही दिवसांपूर्वी जिममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 21 मे: टीम इंडिया (Team India) पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) आणि इंग्लंड विरुद्ध पाच टेस्ट पुढील साडेतीन महिन्यात टीम इंडिया खेळणार आहे. या दौऱ्यात निवड झालेले टीम इंडियाचे प्लेयर्स सध्या  तयारीला लागले आहेत. टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील या दौऱ्याची जय्यत तयारी करत आहे. जडेजानं काही दिवसांपूर्वी जिममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर त्यानं आणखी एका विशेष अभ्यासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जडेजानं दुखापतीनंतर आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) कमबॅक केले होते. चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) या ऑलराऊंडरला घोडेस्वारीचा छंद आहे. त्याच्याकडे देखील अनेक चांगले घोडे असून क्रिकेटमधून वेळ मिळाला की तो घोडेस्वारीचा (horse riding) आनंद घेत असतो. त्याने नुकताच घोडेस्वारी करतानाचा  व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या रायडिंग स्किल चांगले करत आहे, असं कॅप्शन जडेजानं या व्हिडीओला दिले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाचा व्हायरल झाला आहे.

वेस्ट इंडिजचा महान बॉलर जगतोय हालाखीचं आयुष्य, अश्विननं केलं मदतीचं आवाहन

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेला जाण्यापूर्वी टीम इंडियाचे काही खेळाडू सध्या मुंबईमध्ये क्वारंटाईन झाले आहेत. उर्वरित खेळाडू 24 मे रोजी बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. त्यानंतर 2 जून रोजी विशेष विमानानं टीम इंडिया इंग्लंडला रवाना होणार आहे. 18 जून पासून न्यूझीलंड विरुद्धची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सुरु होणार आहे.

First published:

Tags: Cricket, Ravindra jadeja, Video viral, Video Viral On Social Media