• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी भारतीय टीमची धुलाई, सर्वात फास्ट बॉलरही फेल

दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी भारतीय टीमची धुलाई, सर्वात फास्ट बॉलरही फेल

टीम इंडियानं आजवर एकदाही दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. आगामी दौऱ्यात टीमसमोर किती खडतर आव्हान असेल हे मंगळवारी दिसले.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर: टीम इंडिया पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) जाणार आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाचा पहिलाच विदेशी दौरा आहे. भारतीय टीमनं आजवर एकदाही आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकलेली नाही. आगामी दौऱ्यात टीमसमोर किती खडतर आव्हान असेल याचे उदाहरण मंगळवारी दिसले. इंडिया ए विरुद्ध साऊथ आफ्रिका ए (India A vs South Africa A) यांच्यातील पहिल्या अनधिकृत टेस्टला मंगळवारी ब्लोमफोंटेनमध्ये सुरूवात झाली. या टेस्टच्या पहिल्या दिवशी आफ्रिकन टीमनं वर्चस्व गाजवलं. कॅप्टन पीटर मलान  (Pieter Malan) आणि टोनी डी जॉर्जी (Tony De Zorzi) यांनी शतक झळकावल्यानं आफ्रिकेनं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 3 आऊट 343 असा मजबूत स्कोअर केला. पहिल्या दिवसाच्या अखेरीस कॅप्टन मलान (157) आणि जॅसन स्मिथ (51) रनवर खेळत होते. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी आत्तापर्यंत 112 रनची पार्टनरशिप केली आहे. प्रति किलोमीटर 150 पेक्षा जास्त वेगानं बॉलिंग करत आयपीएल स्पर्धेत सर्वांचं लक्ष वेधून घेणारा उमरान मलिक (Umran Malik) देखील फेल गेला. या मॅचमध्ये वास्तविक इंडिया ए नं सुरुवात चांगली केली होती. नवदीप सैनी आणि अरझान नागवसवाला यांनी दोन झटपट विकट घेतल्या. त्यानंतर कॅप्टन मलान आणि डी जॉर्जी यांनी आफ्रिकेला सावरलं. त्यांनी भारतीय बॉलर्सना कोणतीही संधी दिली नाही. भारतीय बॉलर्सना 57 ओव्हर्स एकही यश मिळालं नाही. अखेर उमराननं जॉर्जीला आऊट करत ही जोडी फोडली. जॉर्जीनं 117 रन काढले. IPL 2022: मुंबई - चेन्नई लढतीनं सुरू होणार आयपीएलचा थरार! वाचा तारखांबाबतचे मोठे अपडेट भारतीय स्पिनर्स पहिल्या दिवशी सपशेल अपयशी ठरले. कृष्णप्पा गौतम, राहुल चहर आणि बाबा अपराजित या स्पिनर्सना एकही विकेट मिळाली नाही. चहरनं 19 ओव्हर्समध्ये 75 रन दिले. गौतमनं 20 ओव्हर्स बॉलिंग केल्यानंतरही त्याला विकेट मिळाली नाही.  हनुमा विहारीचा प्लेईग 11 मध्ये समावेश आहे. पण त्याला बॉलिंग देण्यात आली नाही.
  Published by:News18 Desk
  First published: