Home /News /sport /

पाकिस्तानचे पंतप्रधान झाले टीम इंडियामुळे प्रभावित, भारतीय टीमच्या यशाचं सांगितलं कारण

पाकिस्तानचे पंतप्रधान झाले टीम इंडियामुळे प्रभावित, भारतीय टीमच्या यशाचं सांगितलं कारण

1992 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कॅप्टन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imaran Khan) यांनीही टीम इंडियाची प्रशंसा केली आहे.

    इस्लामाबाद, 15 फेब्रुवारी :  भारतीय टीमनं (Team India) ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर त्यांची प्रतिष्ठा आणखी वाढली आहे. आता तर 1992 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कॅप्टन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imaran Khan) यांनीही टीम इंडियाची प्रशंसा केली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये ते बोलत होते. काय म्हणाले इम्रान? “ आजची भारतीय टीम पाहा. ती जगातील आघाडीची टीम बनली आहे, कारण त्यांनी त्यांचा मुलभूत स्तर सुधारला आहे.’’ असं इम्रान यांनी सांगितले. पण त्याचवेळी पाकिस्तानकडं जास्त प्रतिभा आहे, हे सांगायला ते विसरले नाहीत. इम्रान खान हे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे मुख्य संरक्षक आहेत. मात्र सध्याच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांच्याकडे क्रिकेटला देण्यासाठी जास्त वेळ नाही. “कोणताही पाया तयार करायला आणि प्रतिभेचा शोध घेण्यासाठी वेळ लागतो, पण आमची टीम लवकरच जगातील आघाडीची टीम बनेल असा मला विश्वास आहे,’’ असं इम्रान यांनी सांगितले. ( वाचा : पाकिस्तान टीममध्ये पुन्हा वाद, सरफराजने हाफिजला ट्विटरवरच सुनावलं ) पाकिस्ताननं T20 सीरिज जिंकली पाकिस्ताननं रविवारी तिसऱ्या आणि शेवटच्या T20 मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा चार विकेट्सनं पराभव केला. या विजयासह तीन मॅचची ही सीरिज पाकिस्तानं 2-1 अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरनं सर्वात जास्त नाबाद 85 रनची खेळी केली. मिलरच्या फटकेबाजीमुळे दक्षिण आफ्रिकेनं 8 आऊट 164 रन केले. त्याला उत्तर देताना पाकिस्ताननं 18.4 ओव्हरमध्ये 169 रन करत विजय मिळवला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं 42 तर बाबर आझमनं 44 रन केले. मोहम्मद नवाजनं अखेरच्या ओव्हर्समध्ये 11 बॉलमध्ये दोन फोर आणि एका सिक्सच्या मदतीनं 18 रन काढले. तर हसन अलीनं 7 बॉलमध्ये एक फोर आणि दोन सिक्सच्या मदतीनं नाबाद 20 रन काढले. 18 रन आणि दोन विकेट्स घेणारा मोहम्मद नवाज ‘मॅन ऑफ द मॅच’ चा मानकरी ठरला. पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज 2-0 अशी जिंकली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Imran khan, Pakistan, Sports, Team india

    पुढील बातम्या