मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: ब्राव्होनं निवृत्तीनंतर केली मोठी घोषणा, धोनीला दिलासा

T20 World Cup: ब्राव्होनं निवृत्तीनंतर केली मोठी घोषणा, धोनीला दिलासा

वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्होनं (Dwayane Bravo) रविवारी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर ब्राव्होनं निवृत्तीची घोषणा केली होती.

वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्होनं (Dwayane Bravo) रविवारी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर ब्राव्होनं निवृत्तीची घोषणा केली होती.

वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्होनं (Dwayane Bravo) रविवारी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर ब्राव्होनं निवृत्तीची घोषणा केली होती.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 7 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कप दोन वेळा जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची या स्पर्धेत (T20 World Cup 2021) निराशाजनक कामगिरी झाली. त्यांनी पाच पैकी चार मॅच गमावल्या. रविवारी झालेल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजचा 8 विकेट्सनं दणदणीत पराभव केला. वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर ड्वेन ब्राव्होनं (Dwayane Bravo) रविवारी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर ब्राव्होनं निवृत्तीची घोषणा केली होती.

टी20 क्रिकेटमध्ये 500 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा ब्राव्हो हा अनेक फ्रँचायझी टीमचा मुख्य खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला ब्राव्हो टी20 लीगमध्ये खेळणार का? हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानं याबबतची एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

ब्राव्होनं निवृत्तीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, 'माझं शरीर परवानगी देईल तो पर्यंत मी क्रिकेट खेळणार आहे. मी आणखी काही वर्ष फ्रँचायझी क्रिकेट खेळणार आहे.' ब्राव्होच्या या घोषणेनंतर महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) मोठा दिलासा मिळाला आहे. ब्राव्हो हा गेल्या काही वर्षापासून धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमचा महत्तवा सदस्य आहे.

ब्राव्होनं 2004 साली पदार्पण केले होते. तेव्हापासून तो सातत्यानं क्रिकेट खेळत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 6 हजार पेक्षा जास्त रन केले. त्याचबरोबर त्यानं वन-डे क्रिकेटमध्ये 199 आणि टेस्टमध्ये 86 विकेट्स घेतल्या. टी20 इंटरनॅशनलमध्ये त्यानं एकूण 78 विकेट्स घेतल्या आहेत. 2013 साली आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) खेळताना त्यानं सर्वात जास्त 32 विकेट्स घेतल्या आहेत.

T20 WC 2022: सुपर 12 मधील 'या' टीम नक्की, 2 माजी चॅम्पियन्सवर मोठी नामुश्की

ब्राव्होला रिटेन करणार का?

गेल्या 10 वर्षांपासून अधिक काळ सीएसकेकडं असलेला ब्राव्हो हा कॅप्टन धोनीच्या लहान भावासारखा आहे. पण त्याला पुढच्या वर्षी सीएसके रिटेन करण्याची शक्यता कमी आहे. पुढील आयपीएल सिझनपूर्वी (IPL 2022) खेळाडूंचं मेगा ऑक्शन (IPL 2022 mega auction) होणार आहे. दोन नव्या टीम देखील आयपीएलमध्ये येणार असून खेळाडूंना रिटेन करण्याचे नियम देखील बदलणार आहेत. त्या परिस्थितीमध्ये महेंद्रसिंह धोनी ब्राव्होला रिटेन करण्याची शक्यता कमी आहे. पण, ब्राव्होचं सीएसकेशी असलेलं नातं लक्षात घेता लिलावामध्ये सीएसके ब्राव्होला पुन्हा खरेदी करू शकते.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, T20 world cup