मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 WC : ... जेव्हा खेळाडूंचा संयम संपला आणि मैदान बनले 'रणभूमी'!

T20 WC : ... जेव्हा खेळाडूंचा संयम संपला आणि मैदान बनले 'रणभूमी'!

सध्या सर्व क्रिकेट फॅन्सना टी-20 वर्ल्ड कप 2022 क्रिकेट स्पर्धेचे वेध लागले आहेत.

सध्या सर्व क्रिकेट फॅन्सना टी-20 वर्ल्ड कप 2022 क्रिकेट स्पर्धेचे वेध लागले आहेत.

सध्या सर्व क्रिकेट फॅन्सना टी-20 वर्ल्ड कप 2022 क्रिकेट स्पर्धेचे वेध लागले आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 सप्टेंबर :  क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ ओळखला जातो. मात्र काही वेळा खेळाडू त्यांच्या वागणुकीतून या खेळाच्या मैदानालाच भांडणाचा आखाडा बनवतात. सध्या सर्व क्रिकेट फॅन्सना टी-20 वर्ल्ड कप 2022 क्रिकेट स्पर्धेचे वेध लागले आहेत. या निमित्ताने  पूर्वीच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या थरारक लढतींची चर्चा सुरू झालीय. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मॅचबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे क्रिकेट मैदान हे ‘रनभूमी आहे का रणभूमी’ असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. ‘आज तक’ ने याबाबत वृत्त दिलंय.

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप 2022 होणार आहे. 16 ऑक्टोबरला या स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झालेत. आतापर्यंतचा टी-20 वर्ल्ड कपचा इतिहास पाहिला, तर एकापेक्षा एक रोमांचक मॅच या स्पर्धेत झाल्या आहेत. पण काही मॅच अशा होत्या की, ज्यात खेळाडूंचा स्वतःवरचा संयम सुटला आणि क्रिकेटचं मैदान भांडणाचा आखाडाच झालं.

युवराज आणि फ्लिंटॉफ

टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये भारत-इंग्लंड मॅचदरम्यान, युवराजसिंग आणि इंग्लंडचा खेळाडू अँड्र्यु फ्लिंटॉफ यांच्यात झालेला वाद अद्यापही अनेक क्रिकेटप्रेमींना आठवतो. त्या मॅचमध्ये फ्लिंटॉफ 18 वी ओव्हर टाकत होता, तेव्हाच त्याचा युवराजसोबत शाब्दिक वाद झाला. फ्लिंटॉफने युवराजकडे पाहून अश्लील हावभाव केले; पण याचा फटका पुढच्या ओव्हरमध्ये ब्रॉडला सहन करावा लागला. 19 व्या ओव्हरमध्ये युवराजने ब्रॉडच्या सहा बॉलवर सहा सिक्स मारले.

T20 WC : हार्दिक पांड्याचा खेळ पाहून आफ्रिदीनं केलं मोठं वक्तव्य, म्हणाला...

मैदानावरच धक्काबुक्की

मागील वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका-बांगलादेश मॅचदरम्यान बराच गदारोळ झाला होता. या मॅचमध्ये बांगलादेशचा बॅट्समन लिटन दास पॅव्हेलियनमध्ये परतताना श्रीलंकेचा बॉलर लाहिरू कुमाराशी भिडला. दोघांमध्ये विकेट पडल्यानंतर जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झालं. एवढंच नाही, तर बांगलादेशचा दुसरा बॅट्समन मोहम्मद नईमने मध्येच येऊन लाहिरू कुमाराला धक्का देत मागे ढकललं. नंतर अंपायर आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.

श्रीशांत भडकला

2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा फास्ट बॉलर एस. श्रीशांतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये जबरदस्त स्पेल टाकली होता. त्या मॅचमध्ये श्रीशांतने 12 रन देत दोन विकेट घेतल्या होत्या. यादरम्यान त्याची मॅथ्यु हेडनशी बाचाबाचीही झाली होती. नंतर हेडनची विकेट घेण्यात श्रीशांतला यश आलं. मात्र, जास्तकाळ अपील केल्याबद्दल श्रीशांतला मॅच फीच्या 25 टक्के दंडही ठोठावण्यात आला. एका मुलाखतीत श्रीशांतने त्या सेमीफायनल मॅचबद्दल सांगितलं होतं की, त्याला कोणत्याही किंमतीत भारतीय टीमला जिंकून द्यायचं होतं.  त्याला वैयक्तिक दंड झाल्याचं त्याला काहीच दु:ख वाटलं नव्हतं.

Sanju Samson : टी-20 वर्ल्डकपमधून वगळल्यानंतर मिळणार मोठी जबाबदारी!

पाकिस्तानविरुद्ध सलामी

भारतीय क्रिकेट टीमची टी-20 वर्ल्ड कपमध्ये यंदा पहिली मॅच पाकिस्तानविरुद्ध 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणार आहे. यानंतर 27 ऑक्टोबरला भारतीय टीमची मॅच ‘ए’ ग्रुपमधील उपविजेत्या संघाशी होईल, तर 30 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका, आणि 2 नोव्हेंबरला बांगलादेश यांच्याशी भारताची लढत होईल. सुपर-12 मधील भारतीय टीमची शेवटची मॅच 6 नोव्हेंबरला ग्रुप- बी तील विजेत्या संघाशी होईल.

भारतीय क्रिकेट टीमने 2007 नंतर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकलेली नाही. यंदाच्या वर्षी ही स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने भारतीय क्रिकेट टीम मैदानात उतरेल, असा विश्वास देशभरातील क्रिकेट फॅन्सना आहे.

First published:

Tags: Cricket, T20 world cup