• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World कप गाजवणाऱ्या विदेशी खेळाडूकडून टीम इंडियाचा बचाव, हिंदीमध्ये केलं फॅन्सना आवाहन

T20 World कप गाजवणाऱ्या विदेशी खेळाडूकडून टीम इंडियाचा बचाव, हिंदीमध्ये केलं फॅन्सना आवाहन

टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) खराब कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटपटूंवर जोरदार टीका होत आहे. त्याचवेळी एका दिग्गज क्रिकेटपटूनी टीम इंडियाचा बचाव करत फॅन्सना आवाहन केलंय.

 • Share this:
  मुंबई, 1 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup 2021)  सेमी फायनल गाठण्याचा टीम इंडियाचा रस्ता जवळपास बंद झाला आहे. आधी पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंडकडून भारतीय क्रिकेट टीमचा मोठा पराभव झालाय. या दोन मोठ्या पराभवामुळे टीम इंडियाच्या विजयाची पाटी अजून कोरीच आहे. तसंच रनरेटही कमी आहे. त्यामुळे आता एखादा मोठा चमत्कारच या टीमला सेमी फायनलमध्ये नेऊ शकतो. या खराब कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटपटूंवर जोरदार टीका होत आहे. त्याचवेळी एका दिग्गज क्रिकेटपटूनी टीम इंडियाचा बचाव करत फॅन्सना आवाहन केलंय. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसननं (Kevin Pietersen) यानं टीम इंडियाच्या बचावासाठी उडी घेतली आहे. इंग्लंडला 2010 साली टी20 वर्ल्ड कप जिंकून देण्यात पीटरसनचा मोलाचा वाटा होता. त्यानं त्या स्पर्धेत 'प्लेयर ऑफ द सीरिज' चा पुरस्कारही पटकावला होता. पीटरसननं भारतीय फॅन्ससाठी खास हिंदीमध्ये ट्विट केलंय. 'खेळात एक विजेता आणि एक पराभूत होणारा असतो. कोणताही खेळाडू हरण्यासाठी खेळत नाही. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणं ही अभिमानास्पद गोष्ट आहे. कृपया लक्षात घ्या की खेळाडू हे रोबोट नाहीत. त्यांना सदैव तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता असते.' असं ट्विट पीटरसननं केलं आहे. टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी रविवारी झालेल्या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 110 रनच करता आले. रवींद्र जडेजा 19 बॉलमध्ये 26 रनवर नाबाद राहिला, तर हार्दिकने 23 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर ईश सोढीला 2 विकेट मिळाल्या. T20 World Cup: विराटची डोकेदुखी वाढली, वन-डे टीमची कॅप्टनसीही जाणार? भारतानं दिलेलं 111 रनचं आव्हान न्यूझीलंडने 14.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. डॅरेल मिचेलने 35 बॉलमध्ये 49 रन केले, तर केन विलियमसन 33 रनवर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन्ही विकेट घेतल्या.
  Published by:News18 Desk
  First published: