• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ Dream 11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

IND vs NZ Dream 11 Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zeland) यांच्या टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) 28 वी मॅच रविवारी दुबईत होणार आहे.

 • Share this:
  दुबई, 31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zeland) यांच्या टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) 28 वी मॅच रविवारी दुबईत होणार आहे. भारतीय क्रिकेट टीमचा पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानकडून मोठा पराभव झाला होता. तर न्यूझीलंडलाही पाकिस्ताननं पहिल्या मॅचमध्ये हरवलं होतं. त्यामुळे दोन्ही टीमनं स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी ही मॅच जिंकणे आवश्यक आहे. टी20 क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला तर 2016 पर्यंत भारतीय टीमला न्यूझीलंड विरुद्ध एकही मॅच जिंकता आलेली नव्हती. पण, मागच्या 5 वर्षांमध्ये हे चित्र बदललं आहे. मागच्या 11 पैकी 8 मॅच टीम इंडियानं जिंकल्या आहेत. एकूण रेकॉर्डचा विचार केला तर दोन्ही देशांमध्ये 16 टी20 झाल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडनं 8 वेळा तर टीम इंडियानं 6 वेळा विजय मिळवला आहे. दोन मॅच टाय झाल्या असून त्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये लागला आहे. टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या बॉलिंग करत नसल्यानं टीमचं संतुलन बिघडलं आहे. हार्दिकच्या फिटनेसाचाही मोठा प्रश्न आहे. फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारचा फॉर्मही सध्या हरपलाय,. रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे तिघंही लेफ्ट आर्म फास्ट बॉलर्सच्या विरुद्ध संघर्ष करत आहे. मागच्या मॅचमध्ये शाहिन आफ्रिदीनं या तिघांना आऊट केलं होतं. या सर्व अडचणींवर मात करत टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात न्यूझीलंडविरुद्ध पहिला विजय मिळवण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे. डाव्या पायाला दोन बोटं असलेला न्यूझीलंडचा जिगरबाज, टीम इंडियाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज IND vs NZ Dream11 Team Prediction: कॅप्टन: केएल राहुल व्हाईस कॅप्टन - ईश सोधी विकेट किपर ृ ऋषभ पंत बॅटर: रोहित शर्मा, केन विल्यमसन, मार्टीन गप्टील ऑलराऊंडर्स : रविंद्र जडेजा, डेरली मिचेल बॉलर: जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, वरुण चक्रवर्ती भारतीय टीम: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन) सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी न्यूझीलंडची टीम: केन विलियमसन (कॅप्टन), टोड अ‍ॅस्टल, ट्रेन्ट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे,  मार्टिन गप्टिल, केली जेमीसन, डेरिल मिशेल, जिमी निशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, टीम सिफर्ट, ईश सोधी आणि टीम साऊदी
  Published by:News18 Desk
  First published: