• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • India vs Pakistan: पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

India vs Pakistan: पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

T20 World Cup 2021: विराट कोहलीनं पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावलं, पण टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव झाला.

T20 World Cup 2021: विराट कोहलीनं पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावलं, पण टीम इंडियाचा 10 विकेट्सनं पराभव झाला.

टी20 वर्ल्ड कपमधील सुपर 12 मधील (T20 World Cup 2021) पहिल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं 10 विकेट्सनं विजय मिळवला. या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 • Share this:
  दुबई, 25 ऑक्टोबर: टीम इंडियाची पाकिस्तान विरुद्धची वर्ल्ड कप स्पर्धेतील (India vs Pakistan in World Cup) विजयी मालिका अखेर तुटली. टी20 वर्ल्ड कपमधील सुपर 12 मधील (T20 World Cup 2021) पहिल्या मॅचमध्ये पाकिस्ताननं 10 विकेट्सनं विजय मिळवला. या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विराटनं मॅचनंतर सांगितलं की, 'आम्ही आमच्या रणनीतीची अंमलबजावणी करू शकलो नाही. त्यांनी (पाकिस्तानचे खेळाडू) आमच्यापेक्षा प्रत्येक प्रकारात चांगला खेळ केला. एका पराभवानं धोक्याची घंटी वाजवणारी आमची टीम नाही. ही स्पर्धेची सुरुवात आहे, शेवट नाही.' टीम इंडियानं पहिल्या 13 बॉलमध्ये दोन्ही ओपनर गमावले. त्यानंतर पुनरागमन करणे सोपे नव्हते, असं विराटनं स्पष्ट केलं. 'सुरुवातीला 3 विकेट्स गमावल्यानंतर मॅचमध्ये पुनरागमन करणे अवघड होते. मैदानात पडणाऱ्या दवबिंदूची भूमिका देखील नेहमीच महत्त्वाची असते. त्यामुळे परिस्थिती बदलते. अशा परिस्थितीमध्ये 10-20 अतिरिक्त रनची आवश्यकता पडते, पण पाकिस्ताननं खूप चांगली बॉलिंग केली.' असं विराटनं मॅचनंतर सांगितलं. पाकिस्तानच्या विजयानंतर बाबर आझमच्या वडीलांना अश्रू अनावर, VIDEO VIRAL पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) अर्धशतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानला विजयासाठी 152 रनचं आव्हान दिलं. पाकिस्तानने हे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझम (Babar Azam) 51 बॉलमध्ये नाबाद 66 रनवर आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नाबाद 79 रनवर नाबाद राहिला. याआधी टी-20 वर्ल्ड कपच्या 5 मॅचमध्ये आणि वनडे वर्ल्ड कपच्या 7 मॅचमध्ये पाकिस्तानला कधीच भारताचा पराभव करता आला नव्हता. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर शाहिन आफ्रिदीने रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या रुपात भारताला पहिले दोन धक्के दिले, यानंतर हसन अलीने सूर्यकुमार यादवला आऊट केलं. पण विराटने ऋषभ पंतच्या मदतीने भारताच्या इनिंगला आकार दिला. ऋषभ पंतने 30 बॉलमध्ये 39 रन केले. विराट कोहली 49 बॉलमध्ये 57 रन करून आऊट झाला. शाहिन आफ्रिदीने 4 ओव्हरमध्ये 31 रन देऊन तीन विकेट घेतल्या. आफ्रिदीने रोहित, राहुल आणि विराटला आऊट केलं, तर हसन अलीला 2 विकेट घेण्यात यश आलं.
  Published by:News18 Desk
  First published: