मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /T20 World Cup: IPL नंतर फायनल होणार टीम इंडिया, ICC च्या निर्णयाचा BCCI ला फायदा

T20 World Cup: IPL नंतर फायनल होणार टीम इंडिया, ICC च्या निर्णयाचा BCCI ला फायदा

टी20 वर्ल्ड कपबाबत (ICC T20 World Cup 2021) आसीसीनं घेतलेल्या निर्णयाचा मोठा दिलासा टीम इंडियाला (Team India) मिळाला आहे.

टी20 वर्ल्ड कपबाबत (ICC T20 World Cup 2021) आसीसीनं घेतलेल्या निर्णयाचा मोठा दिलासा टीम इंडियाला (Team India) मिळाला आहे.

टी20 वर्ल्ड कपबाबत (ICC T20 World Cup 2021) आसीसीनं घेतलेल्या निर्णयाचा मोठा दिलासा टीम इंडियाला (Team India) मिळाला आहे.

मुंबई, 11 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup 2021) सुपर 12 (Super 12) मध्ये सहभागी होणाऱ्या टीमला मोठा दिलासा मिळाला आहे. आयसीसीनं (ICC) या टीमला बदल करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. क्वालीफायर खेळणाऱ्या टीमसाठी बदल करण्याची मुदत 10 ऑक्टोबर रोजी समाप्त झाली आहे. तर सुपर 12 मधील टीमना 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

आयसीसीच्या एका अधिकाऱ्यानं 'टाईम्स ऑफ इंडिया' ला बोलताना या विषयाची पृष्टी केली आहे. सुपर-12 मधील टीमना विंडो पिरीयड सुरु होण्याच्या 7 दिवस आधीपर्यंत टीममध्ये बदल करता येईल. टीम इंडियासाठी हा कालावधी 23 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. याचाच अर्थ भारतीय टीममध्ये बदल करण्यासाठr 15 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत मुदत आहे.'

टीम इंडियात बदल होणार?

श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल आणि शिखर धवन या खेळाडूंनी यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचा टीममध्ये समावेश होईल अशी आशा आहे. तर दुसरिकडं राहुल चहर आणि हार्दिक पांड्यानं निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे टीममध्ये बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

हार्दिक पांड्याच्या फिटनेसचं निवड समितीला टेन्शन, शेवटच्या क्षणी होणार बदल!

बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, 'टीम इंडियाच्या 15 सदस्यीय मुख्य टीममध्ये किमान एक फास्ट बॉलरची कमतरता आहे. आमच्याकडं शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर हे पर्या. आहे. शार्दुलनं स्वत:ला बॉलिंग ऑल राऊंडर म्हणून सिद्ध केलं आहे. तर दीपकनं श्रीलंका दौऱ्यात चांगली बॅटींग केली आहे.हार्दिकनं बॉलिंग केली नाही तर निवड समिती या दोघांपैकी एकाचा समावेश करू शकते.'

2 कारणांमुळे घेतला कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय, विराटनं केला खुलासा

भारतीय टीम: विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर

First published:

Tags: BCCI, Icc, T20 world cup