• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup Final: सुतारकाम ते वर्ल्ड कप हिरो थक्क करणारा आहे Matthew Wade चा प्रवास

T20 World Cup Final: सुतारकाम ते वर्ल्ड कप हिरो थक्क करणारा आहे Matthew Wade चा प्रवास

ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर-बॅटर मॅथ्यू वेडची (Matthew Wade) चर्चा सध्या सर्व क्रिकेट फॅन्समध्ये आहे. ऑस्ट्रेलियाच्या या वर्ल्ड कप हिरोच्या आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे.

 • Share this:
  मुंबई, 14 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर-बॅटर मॅथ्यू वेडची  (Matthew Wade) चर्चा सध्या सर्व क्रिकेट फॅन्समध्ये आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाला टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये  (T20 World Cup Final) पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप हिरो असलेल्या वेडच्या आयुष्याबद्दल  खूप कमी जणांना माहिती आहे. पाकिस्तान विरुद्ध दुबईमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये वेडनं 17 बॉलमध्ये नाबाद 41 रनची खेळी केली होती. त्यानं पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहीन शाह आफ्रिदीची (Saheen Shah Afridi) चांगलीच धुलाई केली. त्यानं आफ्रिदीनं टाकलेल्या 19 व्या ओव्हरमध्ये सलग 3 सिक्स मारत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि पाकिस्तानला वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं. या वर्ल्ड कपसाठी वेडची निवड होणार की नाही? याबाबत शंकी होती. पण, त्याला संधी मिळाली आणि त्यानं त्यामध्ये स्वत:ली सिद्ध केलं. पाकिस्ताननं दिलेल्या 177 रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 आऊट 96 अशी झाली होती. त्यावेळी अनेकांनी पाकिस्तानच्या विजयाचं भविष्य देखील व्यक्त केलं होतं. पण, वेडनं मार्कस स्टॉयनिससोबत सहाव्या विकेट्साठी नााबाद पार्टरनरशिप करत एक ओव्हर बाकी असतानाच ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. वेडनं कसोटीच्या क्षणी फिनिशरचं काम चोख बजावलं. पण त्याला काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन टीममधून वगळण्यात आलं होतं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णायनंतर वेडची पुन्हा राष्ट्रीय टीममध्ये परतण्याची आशा संपली होती. त्यानं त्यावेळी जगण्यासाठी सुतारकाम सुरू केलं.बांगालादेश विरुद्ध 2017-18 च्या सीरिजसाठी त्याला वगळण्यात आले होते. निवड समितीच्या या निर्णयानंतर आपली क्रिकेट कारकिर्द संपली असं वेडला वाटलं होतं. त्यावेळी तो तस्मानियामधील त्याच्या घरी परतला आणि त्यानं सुतारकाम सुरू केलं. वर्ल्ड कप फायनल कशी जिंकणार? विल्यमसननं सांगितली रणनीती 33 वर्षांच्या वेडनं आजवर 36 टेस्ट 97 वन-डे आणि 54 टी20 इंटरनॅशनलमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 1613 रन असून यामध्ये 4 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तर वन-डेमध्ये त्यानं 1 शतक आणि 11 अर्धशतकांच्या जोरावर 1867 रन काढले आहेत. त्यानं टी20 क्रिकेटमध्ये एकूण 3 अर्धशतक झळकावली असून 729 रन काढले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: