Home /News /sport /

T20 World Cup: 16 वर्षाच्या क्रिकेटपटूचा कहर, पहिल्याच मॅचमध्ये 4 खेळाडूंना केलं Mankading

T20 World Cup: 16 वर्षाच्या क्रिकेटपटूचा कहर, पहिल्याच मॅचमध्ये 4 खेळाडूंना केलं Mankading

T20 वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत 16 वर्षाच्या बॉलरनं 4 खेळाडूंना मंकडिंग (Mankading) पद्धतीनं आऊट करत जगाचं लक्ष वेधलं आहे.

    मुंबई, 13 सप्टेंबर : क्रिकेटच्या नियमाप्रमाणे एखाद्याला मंकडिंग पद्धतीनं (Mankading) आऊट करणे योग्य आहे. पण ते 'जंटलमन्स गेम' या लौकिकाला साजेसं नाही, अशी टीका केली जाते. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत (IPL 2019) आर. अश्विननं (R. Ashwin) या पद्धतीनं जोस बटलरला (Jos Buttler) आऊट केल्यानंतर जोरदार वादळ उठलं होतं. पण एका टी 20 वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीतील मॅचमध्ये एका बॉलरनं पदार्पणातील मॅचमध्येच 4 जणांना या पद्धतीनं आऊट केलं आहे. कॅमेरुन विरुद्ध युगांडा या महिलांच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पात्रता फेरीत हा प्रकार घडला. या मॅचमध्ये कॅमेरुनच्या मेवा डाउमानं  (Maeva Douma)  पदार्पण केलं. या पदार्पणातील मॅचमध्येच तिनं 4 जणांना मंकडिंग पद्धतीनं आऊट करत सर्वांचं लक्ष वेधलं. युगांडानं पहिल्यांदा बॅटींग करता 6 आऊट 190 रन केले. यामध्ये त्यांच्या 4 बॅटर मंकडिंग पद्धतीनं आऊट झाल्या. मेवा डाउमानं केविन एविनो (34), रिटा मुसामली (59), नाकीसूई (21) आणि जेनत बबाजी (5) यांना मंकडिंग पद्धतीनं आऊट केलं. कॅमेरुनचा मोठा पराभव 191 रनचा पाठलाग करताना कॅमेरुनची टीम 14.3 ओव्हरमध्ये 35 रनवरच ऑल आऊट झाली. त्याच्या 10 खेळाडूंना दोन आकडी रन करता आले नाहीत. तर 7 जणी शून्यावर आऊट झाल्या. कॅमेरुनची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय टी20 मॅच होती. त्यांच्या बॅटरला या मॅचमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा दबाव सहन झाला नाही. मंकडिंग आऊट म्हणजे काय?  भारताचे महान अष्टपैलू खेळाडू विनू मंकड 1947-48 दरम्यान सर्वप्रथम या वादात अडकले होते. त्या वेळी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विनू मंकडने बिल ब्राऊन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला वेगळ्याच पद्धतीने आऊट केलं. बिल नॉन स्ट्राईकिंग एंडला असतानाच बॉलिंग करत असलेल्या मंकडने अचानक बेल्स उडवल्या. क्रिकेटच्या नियमाप्रमाणए क्रीजमध्ये नसल्याने बिल ब्राऊन आऊट झाला. US Open 2021: जोकोविचचं इतिहास रचण्याचं स्वप्न अधुरं, फायनलमध्ये झाला धक्कादायक पराभव  ऑस्ट्रेलियन टीमनं यावरून थैमान घातलं. ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनीही भारतीय गोलंदाज कसा चुकीचं वागला याबद्दल लिहून विनू मंकड यांच्याविरोधात रान उठवलं. आजही हे यापद्धतीनं धावबाद करणं खेळाच्या उस्फूर्त भावनेच्या विरोधात असल्याचं मानलं जातं. अशा पद्धतीने आऊट झालं की मंकड डिसमिसल असं म्हटलं जात. मंकडिंग (Mankading) असं क्रियापदच क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये रूढ झालं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news

    पुढील बातम्या