मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 WC : वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्लॅन ठरला! रोहितनं खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला

T20 WC : वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्लॅन ठरला! रोहितनं खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला

T20 World Cup : आगामी टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियानं प्लॅन तयार केलाय. कॅप्टन रोहित शर्मानंच याचा खुलासा केला आहे.

T20 World Cup : आगामी टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियानं प्लॅन तयार केलाय. कॅप्टन रोहित शर्मानंच याचा खुलासा केला आहे.

T20 World Cup : आगामी टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियानं प्लॅन तयार केलाय. कॅप्टन रोहित शर्मानंच याचा खुलासा केला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 सप्टेबर : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय टीम ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका विरूद्ध 6 मॅच खेळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी म्हणून या मॅचकडे पाहिलं जात आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं या मालिकेपूर्वी सर्व खेळाडूंना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.  खेळाडूंनी 'कम्फर्ट झोन' मधून बाहेर पडून खेळावं,' असं रोहितनं सांगितलं आहे. यापूर्वी झालेल्या आशिया कप स्पर्धेत टीम मॅनेजमेंटनं काही प्रयोग केले होते. त्यावर त्यांना टीका सहन करावी लागली होती.

भारत आणि ऑस्ट्रेलिया  यांच्यातील 3 मॅचची टी-20 सीरिज उद्या, मंगळवार (20 सप्टेंबर 2022) पासून सुरू होत आहे.  ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सीरिजमध्ये हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग या खेळाडूंना टीम मॅनेजमेंटने विश्रांती दिली आहे.

रोहित शर्मा म्हणाला, ‘मला टीममध्ये सुरक्षिततेची भावना आणायची होती. त्यामुळेच आम्ही या दोन्ही सीरिज आणि वर्ल्ड कप स्पर्धेसाठी एकच टीम निवडली आहे. आशिया कप स्पर्धेतही आमची जवळपास हिच टीम होती. या 6 मॅचमध्ये आम्हाला आणखी वेगळं काय करता येईल, या दृष्टीने प्रयत्न असतील. टीमसाठी अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी खेळाडू स्वत:च्या खेळात वैविध्यपूर्णता आणू शकतात.’

आयपीएलमध्ये करोडोंची बोली, पण टी20 वर्ल्ड कप संघात का मिळाली नाही या खेळाडूंना जागा?

कोहलीनं करून दाखवलं

आशिया कप स्पर्धेत विराट कोहली 'कम्फर्ट झोन'मधून बाहेर पडून स्वीप शॉट खेळला. या पूर्वी त्याने असं कधी केलं नव्हतं. आता पुढील सीरिजमध्ये रोहितला टीममधील अन्य खेळाडूंकडून तशीच अपेक्षा आहे. तो म्हणाला, ‘आम्ही खेळाडूंना वैविध्यपूर्ण शैलीत खेळण्यासाठी आणखी प्रयत्न करायला प्रवृत्त करू. उदाहरणार्थ, एखादा बॅट्समन जो रिव्हर्स स्वीप खेळू शकत नाही, त्याला तसं खेळणं जमेल का? याचा प्रयोग करू. ज्या गोष्टी खेळाडूंना करणं सोयीचं वाटत नाही, ते करण्यास सांगू, त्यानंतर काय होतं ते पाहूयात.’

संकटातून बाहेर पडण्याचा प्लॅन

रोहित म्हणाला, ‘जेव्हा भारतीय टीम वर्ल्ड कप खेळण्यासाठी जाईल, तेव्हा टीमकडे सर्व गोष्टींची उत्तरं असायला हवीत. उदाहरणार्थ, बॉलर त्यांच्या सुरुवातीच्या स्पेलमध्ये यॉर्कर किंवा बाउन्सर बॉल टाकू शकतात. गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीला बाहेर पडल्यानंतर भारताने बॅटिंगचा दृष्टिकोन बदलला. तो पुढे म्हणाला की, ‘टीम आक्रमक खेळ सुरू ठेवेल, आणि जर विकेट लवकर पडल्या तर त्यांच्याकडे पर्यायी योजनादेखील असेल. टीम संकटात सापडली तर त्यातून बाहेर येण्याचा प्लॅनसुद्धा आहे.’

Ind vs Aus: शमीच्या जागी उमेश यादवचीच निवड का झाली? रोहितनं दिलं हे उत्तर...

‘खेळाडूंना चांगलं माहीत आहे की, जर टीमचा स्कोअर 3 विकेट्सवर 10 रन असेल, तर बॅटिंग कशी करावी लागेल? जर स्कोअर एकही विकेट न जाता 50 असेल, तर बॅटिंग कशी करायची? या गोष्टींवर बराच काळ चर्चा होत असून, आता त्यांची अंमलबजावणी होणं बाकी आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 6 मॅचेसनंतर टीमची आणखी एक मीटिंग घेतली जाईल,’ असंही रोहितने स्पष्ट केलं.

First published:

Tags: Cricket news, India vs Australia, Rohit sharma, Team india