• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 वर्ल्ड कपमध्ये 'हे' काय सुरूय? पहिला बॉल पडण्यापूर्वीच ठरतो मॅचचा निकाल

T20 वर्ल्ड कपमध्ये 'हे' काय सुरूय? पहिला बॉल पडण्यापूर्वीच ठरतो मॅचचा निकाल

टी20 वर्ल्ड कपमधील सुपर 12 मध्ये (T20 World Cup 2021) आत्तापर्यंत 9 मॅच झाल्या आहेत. पाकिस्तान, इंग्लंड या टीमनं या स्पर्धेची सुरुवात दमदार केली आहे. या स्पर्धेत आजवर झालेल्या मॅचमध्ये एक योगायोग घडला आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमधील सुपर 12 मध्ये (T20 World Cup 2021) आत्तापर्यंत 9 मॅच झाल्या आहेत. पाकिस्तान, इंग्लंड या टीमनं या स्पर्धेची सुरुवात दमदार केली आहे. तर टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजनं निराशा केली आहे. यूएई आणि ओमानमध्ये सुरु असलेल्या या वर्ल्ड कपमध्ये एक अजब योगायोग पाहयला मिळत आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत झालेल्या मॅचमध्ये हा योगायोग दिसला आहे. सुपर 12 (Super 12) मध्ये बुधवारपर्यंत झालेल्या 9 पैकी 8 मॅचमध्ये टॉस जिंकणाऱ्या टीमनं मॅच जिंकली आहे. इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (England vs Bangladesh) यांच्यात झालेली मॅच हा याला एकमेव अपवाद आहे. या मॅचमध्ये बांगलादेशनं टॉस जिंकूनही मॅच गमावली होती. यूएईमध्ये सध्या 25 ते 30 डिग्री सेल्सियसच्या दरम्यान तापमान आहे. याचाच अर्थ थंडी आणि ऊन दोन्हीही समान आहे.  पण संध्याकाळी मैदानात दव पडत असल्यानं बॉलिंग करायला अवघड होत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये (India vs Pakistan) टीम इंडियाला याचा मोठा फटका बसला. मॅच सुरू झाल्यावर मैदानात दव नव्हते. पण, दुसऱ्या इनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात ते जमा झाले होते. त्याचा परिणाम टीम इंडियाच्या बॉलिंगवर झाला. T20 World Cup: न्यूझीलंडविरुद्ध मिटणार विराटची डोकेदुखी, दुबईतून आली Good News विराट कोहलीनंही मॅचनंतर बोलताना याचा  फटका टीमला बसल्याचं सांगितलं होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये होणाऱ्या या त्रासामुळे टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्यावरच बहुतेक कॅप्टन भर देत आहेत. दुबईतील मॅचमध्ये तर दुसऱ्यांदा बॅटींग करणारी टीमच आजवर जिंकली आहे. त्यामुळे टॉसला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. मॅचमधील पहिल्या बॉलपूर्वीच ठरणाऱ्या या निकालामुळे कॅप्टनचं टेन्शन आणखी वाढलंय. टी20 वर्ल्ड कपमधील पॉईंट टेबलचा विचार केला तर ग्रुप 1 मधून इंग्लंड आणि ग्रुप 2 मधून पाकिस्तानची टीम प्रत्येकी दोन मॅच जिंकून सध्या आघाडीवर आहे.
  Published by:News18 Desk
  First published: