मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup 2021: ...म्हणून अनुभवी युजवेंद्र चहलच्या जागी झाली राहुल चहरची निवड

T20 World Cup 2021: ...म्हणून अनुभवी युजवेंद्र चहलच्या जागी झाली राहुल चहरची निवड

टी 20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये लेग स्पिनर युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) समावे श करण्यात आलेला नाही. चहलला टीममध्ये जागा न मिळाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. च

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 सप्टेंबर : टी 20 वर्ल्ड कपसाठी (ICC T20 World Cup 2021) निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये लेग स्पिनर युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) समावे श करण्यात आलेला नाही. चहलला टीममध्ये जागा न मिळाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. चहल हा टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारकीय स्पिन आहे. त्याच्या जागी मुंबई इंडियन्सच्या राहुल चहरची (Rahul Chahar) टीममध्ये निवड करण्यात आली आहे. अनुभवी चहलच्या जागी राहुलवर विश्वास का ठेवण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी दिलं आहे.

शर्मा यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितले की, 'आम्हाला वेगानं बॉल टाकू शकेल अशा लेग स्पिनरची गरज होती. आम्ही नुकतंच चहरला चांगल्या गतीनं बॉल टाकताना पाहिलं होतं. ते पाहून याच स्पिनरची आपल्याला गरज आहे, असं निवड समितीला वाटलं. चहल आणि राहुल यांच्या नावावर बराच विचार करण्यात आला. अखेर सर्वसंमतीनं राहुलची निवड करण्यात आली. '

श्रीलंका दौऱ्यात मिळाली होती संधी

राहुल चहर आणि युजवेंद्र चहल हे दोघंही मागील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये 3 वन-डे आणि तितक्याच टी20 सामन्यांची मालिका झाली. चहल वन-डे मालिकेतील 2 सामने खेळला. यामध्ये त्यानं चांगली बॉलिंग करत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

चहलनं पहिल्या टी 20 सामन्यात 1 विकेट घेतली होती. त्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं उर्वरित 2  सामने खेळू शकला नाही. तर दुसरिकडं चहरनं 2 टी 20 आणि 1 वन-डे सामना खेळला. त्यानं 2 टी20 मध्ये 4 तर एकमेव वन-डेमध्ये 3 विकेट्स घेतल्या.

T20 World Cup 2021: पाकिस्तान विरुद्ध 'या' 11 जणांचा करणार विराट समावेश, पाहा Playing 11

2 वर्षांमध्ये कामगिरी घसरली

अनुभवाच्या आधारावर चहलचं पारडं जड आहे. पण मागील काही वर्षात चहलची टी20 मधील कामगिरी घसरली आहे. याच कारणामुळे त्याला वर्ल्ड कपच्या टीममध्ये जागा मिळालेली नाही. चहलनं जून 2016 मध्ये टी 20 मध्ये पदार्पण केले. त्यानंतरची 3 वर्ष त्याची कामगिरी दमदार होती. मागच्या दोन वर्षात त्याला प्रभावी कामगिरी करता आलेली नाही.

चहलनं सप्टेंबर 2019 पासून 18 टीमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 36.58 आहे. जी त्याच्या करिअरच्या एकूण सरासरीपेक्षा जास्त आहे. याच कारणामुळे अनुभवी असूनही निवड समितीनं चहलचा टीममध्ये समावेश केला नाही.

ऑचहरचा स्ट्राईक रेट चांगला

युजवेंद्र चहलनं त्याच्या आजवरील टी 20 कारकिर्दीमध्ये 207 सामन्यात 24.67 च्या सरासरीनं 227 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 19.40 आहे. तर राहुल चहरनं 66 टी20 सामन्यात 82 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी 21.36 असून स्ट्राईक रेट 17 आहे. चहलपेक्षा राहुल चहरची आकडेवारी अधिक चांगली असल्यानंच टी 20 वर्ल्ड कपसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

First published:

Tags: Cricket news, T20 world cup