दुबई, 27 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं गतविजेत्या वेस्ट इंडिजचा (South Africa vs West Indies) 8 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. या मॅचमध्ये अंपायरिंग करणारे अलीम डार (Aleem Dar) एकाच बॉलवर 2 वेळा थोडक्यात बचावले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. डार यांनी ज्या पद्धतीनं चपळता दाखवत स्वत:चा जीव वाचवला त्याबद्दल त्यांची सर्वजण प्रशंसा करत आहेत.
वेस्ट इंडिजच्या इनिंगच्या 20 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. यावेळी स्ट्राईकवर असलेल्या पोलार्डनं प्रिटोरियसच्या बॉलवर सरळ शॉट मारला. तो बॉल वेगानं अंपायरच्या दिशेनं गेला. त्यावेळी डार यांनी तातडीनं बाजूला होत स्वत:ला दुखापतीपासून वाचवले. पण या गडबडीत ते खाली पडले.
पोलार्डनं मारलेला बांऊड्रीवर जाणारा बॉल आफ्रिकेचा फिल्डर रासी वान डेर दुसान याने अडवला आणि थ्रो केला. यावेळी देखील तो बॉल डार यांना लागला असता पण त्यांनी चपळतेनं स्वत:ला दूर करत पुन्हा एकदा जीव वाचवला.
वेस्ट इंडिजचा दुसरा पराभव
दुबईमध्ये झालेल्या या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 विकेट्सनं पराभव झाला. यापूर्वी इंग्लंडनं त्यांना 6 विकेट्सनं पराभूत केलं होतं.
Aleem Dar pic.twitter.com/33nwLghf71
— Abdul Hadi (@Abdul_Hadi_1) October 26, 2021
वेस्ट इंडिजचे उरलेले सामने आता बांगलादेश, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी वेस्ट इंडिजला आता उरलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे. पहिल्या ग्रुपमध्ये असलेली वेस्ट इंडिज पॉईंट्स टेबलमध्ये अखेरच्या क्रमांकावर आहे. तसंच त्यांचा नेट रनरेट -2.550 एवढा आहे, त्यामुळे सेमी फायनलमध्ये जाण्यासठी वेस्ट इंडिजला उरलेल्या तिन्ही मॅच मोठ्या फरकाने जिंकून नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे.
VIDEO: शोएब अख्तरची Live Show मधून पाकिस्तानी अँकरनं केली हकलपट्टी! पाहा संपूर्ण ड्रामा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 world cup, Video viral