मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंड घेणार मोठा निर्णय, नंबर 1 प्लेयर होणार आऊट!

T20 World Cup: पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंड घेणार मोठा निर्णय, नंबर 1 प्लेयर होणार आऊट!

टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) इंग्लंडची पहिली लढत वेस्ट इंडिजशी (England vs West Indies) आहे. मागील टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup 2016 Final) वेस्ट इंडिजनं इंग्लंडचा पराभव केला होता.

  • Published by:  News18 Desk

दुबई, 23 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) सुपर 12 फेरीला आजपासून (शनिवार) सुरूवात होणार आहे.  पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाची लढत दक्षिण आफ्रिकेशी (Australia vs South Africa) होणार आहे. तर संध्याकाळी दुबईत होणाऱ्या मॅचमध्ये इंग्लंडची लढत वेस्ट इंडिजशी (England vs West Indies) आहे. मागील टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (T20 World Cup 2016 Final) वेस्ट इंडिजनं इंग्लंडचा पराभव केला होता. या पराभवाची बदला घेण्याची संधी इंग्लंडला आहे.

दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिजचा फॉर्म सध्या चांगला नाही. वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या दोन्ही प्रॅक्टीस मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव झालाय. तर भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर इंग्लंडनं न्यूझीलंडचा दुसऱ्या प्रॅक्टीस मॅचमध्ये पराभव केला होता. इंग्लंडची टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. पहिली मॅच जिंकून या वर्ल्ड कप अभियानाचा जोरदार शुभारंभ करण्याची त्यांचा निर्धार असेल.

या मॅचमध्ये इंग्लंड एक धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे. नंबर 1 टी20 बॅटर डेव्हिड मलानला  (David Malan) या मॅचमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.  इंग्लंडच्या दोन्ही वॉर्म-अप मॅचमध्ये तो फेल गेला. त्याच्या जागी मोईन अलीला (Moeen Ali) नंबर 3 वर खेळण्याची संधी मिळू शकतेय मोईननं आयपीएल 2021 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) जोरदार कामगिरी केली आहे. त्याची स्पिन बॉलिंग देखील टीमसाठी उपयुक्त आहे.

T20 World Cup: एकाच बॉलवर 3 वेळा Run Out होताना वाचले खेळाडू, पाहा मजेशीर VIDEO

डेव्हिड मलानचा टी20 रेकॉर्ड पाहिला तर त्यानं 30 मॅचमध्ये 43 च्या सरासरीनं 1123 रन काढले आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 139 आहे. मलानं एक शतक आणि 11 अर्धशतक देखील झळकावली आहेत. पण, त्यानं करिअरमधील बहुतेक मॅच या मायदेशात खेळल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या वॉर्म-अप मॅचमध्ये तो फक्त 15 बॉलमध्ये 11 रन काढून आऊट झाला. त्यापूर्वी भारताविरुद्ध त्यानं 18 बॉलमध्ये 18 रन काढले होते.

T20 World Cup Team India Schedule: टीम इंडियाचं वेळापत्रक नक्की, 'या' टीमशी होणार सामना

मोईन अलीला दुसऱ्या मॅचमध्ये आराम देण्यात आला होता. त्यानं भारताविरुद्ध 20 बॉलमध्ये नाबाद  43 रनची खेळी केली होती. या खेळीनंतर त्याचा टीममध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात येत आहे. 2016 च्या टी20 वर्ल्ड कपनंतर पॉवर प्लेमध्ये मोईन अलीचा स्ट्राईक रेट 126 आहे. तर मलानचा 115 आहे. यावर्षी मलान फारसा फॉर्मात नाही. त्याची या वर्षभरातील सरासरी 27 असून स्ट्राईक रेट फक्त 114 आहे. मोईन अलीनं आयपीएल फायनलमध्ये आक्रमक खेळी करत धोनीच्या टीमला चॅम्पियम बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

First published:

Tags: Australia, England, T20 world cup